यासेर उर्दू शाळेत मराठी भाषा गौरव दिनानिमित्त् विविध स्पर्धा
सेलू : येथील गौरव सेवाभावी संस्था संचालित यासेर उर्दू प्राथमिक शाळेत राज्य भाषा मराठी गौरव दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त कविता गायन स्पर्धा आणि सुंदर हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली.
मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी असल्यामुळे हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी कुसुमाग्रज यांनी अथक परिश्रम केले आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. संघर्षांला आणि त्यांच्या दर्जेदार कलाकृतींना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने त्यांच्या जन्मदिवशी म्हणजेच ‘मराठी भाषा दिन’ साजरा करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती शिक्षक सय्यद इमरान यांनी दिली.
प्रारंभी कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. खान तहमीना यांनी कवि कुसुमाग्रज यांच्या जीवनावर प्रकाश टकला.मुख्यध्यापक जावेद खान फेरोज खान पठाण यांनी मराठी भाषा विषयावर विधार्थीना मार्गदर्शन केले. सय्यद अमन शेख, साजिद माविया हाश्मी, सय्यद अज़ीम. पठाण नजमा, सीमा पठाण, नफीसा बाजी आदींनी परिश्रम घेतले.