मराठी भाषा हे प्रगतीचे द्वार आहे : सुमिता सबनीस

मराठी भाषा हे प्रगतीचे द्वार आहे : सुमिता सबनीस

विवेकानंद विद्यालयात मराठी भाषा राजभाषा दिन साजरा

सेलू : मुलांना मातृभाषेतून शिक्षण दिले पाहिजे. मराठी माध्यमातून शिक्षण पूर्ण झालेले हजारो विद्यार्थी उच्च पदावर कार्यरत आहेत. आपल्या मनातील भावना आपण मराठीतच व्यक्त करत असतो. म्हणून मराठी भाषा हे प्रगतीचे द्वार आहे, असे मत सुमिता सबनीस यांनी व्यक्त केले.

भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचालित विवेकानंद प्राथमिक विद्यालयात विष्णू वामन शिरवाडकर ( कुसुमाग्रज )यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन (२७ फेब्रुवारी) उत्साहात साजरा करण्यात आला. व्यासपीठावर अध्यक्ष हरिभाऊ चौधरी, उपेद्र बेल्लुरकर यांची उपस्थिती होती. सबनीस यांनी आपल्या भाषणातून मराठी भाषेचे महत्व विशद केले.हरिभाऊ चौधरी यांनी संस्कृती व संस्कार मराठी भाषेतूनच चांगले रुजविल्या जातात.वडिलांना पप्पा व आईला मम्मी न म्हणता बाबा व आई म्हणावे, असे त्यांनी सांगितले.
इयत्ता १ ली ते ५ वी च्या विद्यार्थ्यांनी पोवाडा, कविता, महाराष्ट्रगीत, साप्ताहिक वारांचे गीत, शेतकरी गीत, देशभक्ती गीत यांचे सादरीकरण केले. सुत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख विजय चौधरी, प्रास्ताविक रागिणी जकाते यांनी केले. आभार अनिल कौसडीकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी काशिनाथ पांचाळ, मंगेश खरात, दीपाली पवार, शारदा पुरी, सोनाली जोशी, सीमा कुंभकर्ण आदींनी प्रयत्न केले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!