संविधानिक अधिकार समाप्त केले जात आहेत : कॉम्रेड प्रकाश कारत

संविधानिक अधिकार समाप्त केले जात आहेत : कॉम्रेड प्रकाश कारत

माकपच्या राज्य अधिवेशनाचे सेलूमध्ये उद्घाटन, ४५० पेक्षा अधिक प्रतिनिधींचा सहभाग

परभणी : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या २४ व्या महाराष्ट्र राज्य अधिवेशनाचे उद्घाटन गुरुवारी (२७‌ फेब्रुवारी ) सेलू (जि.परभणी) येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरोचे केंद्रीय समन्वयक कॉम्रेड प्रकाश कारत यांच्या हस्ते झाले. या वेळी मार्गदर्शन करतांना कॉम्रेड प्रकाश कारत यांनी केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारवर जोरदार हल्ला चढविला. सरकार राबवित असलेल्या ध्येय धोरणांमुळे  संविधानिक अधिकार समाप्त केले जात आहेत. केंद्रीय यंत्रणाचा दुरुपयोग केला जात आहे. असे कारत म्हणाले.

यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पॉलिट ब्युरो सदस्य माजी खासदार कॉम्रेड निलोत्पल बसु, कॉम्रेड डॉ.अशोक ढवळे, राज्य सचिव कॉम्रेड डॉ.उदय नारकर, माजी आमदार नरसय्या आडम, जे.पी.गावित, मरियम ढवळे, उदयन शर्मा, डहाणूचे आमदार कॉम्रेड विनोद निकोले, स्वागताध्यक्ष प्रा.भाई यू.आर.थोंबाळ, डॉ.अजित नवले, स्वागत समितीचे कॉम्रेड रामेश्वर पौळ, कॉम्रेड उद्धव पौळ, कॉम्रेड रामकृष्ण शेरे पाटील, दत्तुसिंग ठाकूर, रामराजे महाडिक, इंदुमती महाडिक उपस्थित होते.

....................... SAKASH NEWS https://chat.whatsapp.com/KNhQQNYmKEe49WgafxhdTH

या वेळी मार्गदर्शन करतांना कॉम्रेड प्रकाश कारत म्हणाले, ” देशातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या, नवउदारमतवादी धोरणातून केवळ भांडवलदारांचे हित जपले जात आहे. हुकुमशाही आणि बळाच्या जोरावर हिंदुत्ववादी अजेंडा राबविला जात आहे. संविधानिक अधिकार समाप्त केले जात आहेत. केंद्रीय यंत्रणाचा दुरुपयोग केला जात आहे, असे नमूद करून भाजपच्या मागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची फॅसिस्ट विचारधारा आहे, असा आरोप प्रकाश कारत यांनी केला. भारतीय जनता पक्षाला सत्तेवरून हलविण्यासाठी सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांना सोबत घेऊन काम करावे लागेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. सेलू येथील साई नाट्यगृहात आयोजित या अधिवेशनात राज्यभरातील ३१ जिल्ह्यातील सुमारे ४५० निवडक प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. शनिवारी अधिवेशनाचा समारोप होणार आहे.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या २४ व्या महाराष्ट्र राज्य अधिवेशनाच्या निमित्ताने सेलू शहराच्या मुख्य रस्त्याने पक्षाचे ध्वजा, डिजिटल बॅनर, पताके झळकले आहेत. कॉम्रेड कुमार शिराळकर नगरी अधिवेशन स्थळही सजले असून पुस्तकांचे स्टॉल लागले आहेत. राज्यभरातून मोठ्या संख्येने पक्षाचे प्रतिनिधी अधिवेशनात सहभागी झाले आहेत. यामध्ये महिला प्रतिनिधींचाही सहभागही उल्लेखनीय आहे. 

....................... SAKASH NEWS https://chat.whatsapp.com/KNhQQNYmKEe49WgafxhdTH

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!