लाडक्या गुरुजींना निरोप देताना विद्यार्थी भावुक

लाडक्या गुरुजींना निरोप देताना विद्यार्थी भावुक

शिक्षक पंढरीनाथ बुधवंत यांच्या प्रदीर्घ सेवेचा भोगावच्या शाळेत गौरव 

जिंतूर : तालुक्यातील भोगाव (देवी) येथील जिल्हा परिषद प्रशालेतील शिक्षक पंढरीनाथ बुधवंत हे ३८ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले. शुक्रवारी, २८ फेब्रुवारी रोजी त्यांच्या सेवेचा गौरव एका कार्यक्रमात करण्यात आला. या वेळी आपल्या लाडक्या गुरुजींना निरोप देताना शाळेचे विद्यार्थी भावुक होऊन गेले होते.

सेवा गौरव समारंभप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून वाशिमचे शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, जिंतूर बाजार समितीचे संचालक कृष्णकांत देशमुख, केंद्रप्रमुख के.सी.घुगे, बाळू बुधवंत, मनोज तोडकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष‌रावसाहेब फरकांडे, मुख्याध्यापक श्री.कलगुंडे, श्री. राठोड, श्री.काळबांडे , सौ.जाधव, श्री.सरनाईक आदींची प्रमुख उपस्थिती होती.

या वेळी बोलताना श्री भुसारे यांनी, शिक्षक हा समाजाचा शिल्पकार असतो आणि पंढरीनाथ बुधवंत यांनी आपल्या कार्यातून हे सिद्ध करून दाखवले आहे. त्यांची शिक्षकपदाची कारकीर्द ही प्रेरणादायी असून, भविष्यातील पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल, अशा शब्दांत बुधवंत यांच्या सेवेचा गौरव केला. बुधवंत यांनी आपल्या अध्यापन कार्यातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली आणि शाळेच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलला, असेही ते म्हणाले.

या वेळी श्री.भुसारे यांनी जिल्हा परिषद शाळांचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, की ग्रामीण भागातील शिक्षणसंस्था टिकल्या पाहिजेत, कारण त्या समाजाच्या उन्नतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कार्यक्रमाची सांगता विद्यार्थी, शिक्षक आणि मित्र परिवाराच्या सहभोजनाने झाली. विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या गुरुजींना निरोप देताना भावुक होत त्यांच्यासोबतच्या आठवणी जागवल्या.

पंढरीनाथ बुधवंत यांनी आपल्या भावना व्यक्त करत, “शिक्षक म्हणून विद्यार्थी घडवताना मिळालेला आनंद आणि समाधान अतुलनीय आहे,” असे सांगितले. भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शैक्षणिक पर्यटनाचा अनुभव घेण्याचा संकल्प त्यांनी घेतला.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!