ज्ञानसाधना प्रतिष्ठानच्या विज्ञान प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त उपक्रम
परभणी : राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त तालुक्यातील ज्ञानसाधना प्रतिष्ठानच्या वतीने २८ फेब्रुवारी रोजी आयोजित विज्ञान प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रदर्शनात १३० विज्ञान प्रकल्प व पोस्टरचे सादरीकरण करण्यात आले.
भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस चंद्रशेखर वेंकट रमण यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. विज्ञानाबद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी व विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो.
राष्ट्रीय विज्ञान दिनाचे मूळ उद्दिष्ट विद्यार्थ्यांना विज्ञानाकडे आकर्षित करणे आणि त्यांना प्रेरित करणे हा आहे. यासोबतच विज्ञान आणि वैज्ञानिक कामगिरीबद्दल लोकांमध्ये जागृती निर्माण करणे हे महत्त्वाचे काम विज्ञान प्रदर्शनातून केले जाते. विज्ञानाशिवाय विकासाचा मार्ग पुढे जाऊ शकत नाही व विज्ञानातील गैरसमज व अंधश्रद्धा नष्ट करणे हा मूळ उद्देश साध्य केला जातो.
यावर्षी ज्ञानसाधना प्रतिष्ठान संस्थे अंतर्गत येणाऱ्या रायरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, धर्मापुरी पाटी, ज्ञानसाधना प्रतिष्ठान पब्लिक स्कूल, परभणी.,बळीराजा सन्मान योजना, इंद्रायणी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मांडाखळी., संताई कनिष्ठ महाविद्यालय, मांडाखळी. तसेच ज्ञानसाधना NEET & JEE फाउंडेशन, धर्मापुरी पाटी, परभणी च्या नर्सरी ते अकरावीच्या च्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. सुमारे १३० विज्ञान प्रकल्प व पोस्टर चे सादरीकरण करण्यात आले होते. विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थाध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के व संस्था सचिव प्रा.शीतल सोनटक्के यांच्या हस्ते करण्यात आले.
या विज्ञान प्रदर्शनात Artificla Intelligence, Medern Agriculture, Smart Railway Station, Chandrayan 3, AI Technology, AI Farming, Smart City, Multipurpose Device, Home Made Microscope इत्यादी विज्ञान प्रकल्प सादर करण्यात आले. तसेच Study of Geometrical Shapes, Fun with Mathematics इत्यादी गणितीय प्रकल्प व अंधश्रद्धा निर्मूलन, पर्यावरण प्रदूषण, जागतिक तापमान वाढ इत्यादी विषयांवर पोस्टर सादरीकरण करण्यात आले होते.
विज्ञान दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा उद्घाटक संस्था अध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के, प्रमुख पाहुण्या संस्था सचिव प्रा. शितल सोनटक्के होत्या. तर परीक्षक म्हणून सोनू कुमार यादव , श्री रियाज, श्री. सुरज कुमार चौरसिया, नंदिनी वैरागड होत्या. या प्रसंगी सर्व समन्वयक व विभाग प्रमुख यांची उपस्थिती होती.विज्ञान प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी सर्व विज्ञान शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.