प्रा.रामेश्वर गटकळ यांना “इंद्रप्रस्थ नॅशनल अवार्ड”

प्रा.रामेश्वर गटकळ यांना “इंद्रप्रस्थ नॅशनल अवार्ड”

नवी दिल्ली येथील कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सन्मान

सेलू (जि.परभणी) : नवी दिल्ली येथील इंटीग्रेटेड ग्लोबल युनिव्हर्सिटीद्वारे सेलू येथील गटकळ करिअर अकॅडमीचे संचालक प्रा. रामेश्वर गटकळ‌ यांचा शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल “इंद्रप्रस्थ नॅशनल अवार्ड” देऊन सन्मान करण्यात आला. नवी दिल्ली येथील रेडिसन ब्लू, द्वारकामध्ये हा कार्यक्रम शनिवारी, १ मार्च रोजी पार पडला‌. या वेळी भारतातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ३० व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी प्रोफेसर डॉ.दिव्या तणवार, शाम स्वरूप भटनागर, डॉ.राम बहाद्दर दुबे, महंत नीरज स्वामीजी, नीरज कुमार, तपन कृष्णन काकाटी, डॉ.शिवाजी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुरस्काराबद्दल प्रा.रामेश्वर गटकळ यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!