सेलू शहरात कडकडीत बंद

सेलू शहरात कडकडीत बंद

परभणी : मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्येतील मुख्यसूत्रधार वाल्मिक कराड व त्याचे साथीदार तसेच धनंजय मुंढे यांना सहआरोपी करून कडक शासन करण्यात यावे तसेच खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी आदी मागण्यांसाठी शुक्रवारी, ७ मार्च रोजी सकल मराठा समाजाच्यावतीने ‘सेलू बंद’ ची हाक देण्यात आली होती.‌ उत्स्फूर्त प्रतिसाद देत व्यापार्‍यांनी सेलू शहरात कडकडीत बंद पाळला. व्यापार्‍यांनी आपापली आस्थापने बंद ठेवून बंदमध्ये सहभाग नोंदवला. बंद शांततेत पार पडला. सकाळपासून मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट होता. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!