महेश खासगी बाजारच्या वायदे बाजारात गर्दी

महेश खासगी बाजारच्या वायदे बाजारात गर्दी

सेलूमध्ये कापसाला ७ हजार ३३० रूपये भाव

परभणी : सेलू येथील महेश खासगी बाजार समितीच्या यार्डात शुक्रवारी, ७ मार्च रोजी झालेल्या जाहीर लिलावात उच्च प्रतीच्या कापसाला प्रतिक्विंटल भाव ७ हजार ३३० रूपये एवढा चांगला भाव मिळाला आहे. यामुळे वायदे बाजारात कापूस उत्पादक शेतकऱ्यांची गर्दी दिसून आली. मध्यम प्रतीच्या कापसाला प्रतिक्विंटल ७ हजार ३१५ तर कमीत कमी ७ हजार २६५ रूपये भाव मिळाला आहे. या वेळी गोपाल काबरा, रामेश्वर‌ राठी, निर्मलकुमार, अविनाश बिहाणी, श्री.पणवार, अभिषेक तायल, श्रीशिव त्रिधारा जिनिंगचे प्रतिनिधी आणि कापूस खरेदीदार उपस्थित होते. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी आणला होता. रवळगाव रस्त्यावर शेतकऱ्यांच्या वाहनांच्या रांगा दिसून आल्या. महेश खासगी बाजारकडून नियमित खरेदी सुरू असून आतापर्यंत ६० हजार क्विंटल कापूस खरेदी झाली असल्याची माहिती प्रभुदयाल मंत्री यांनी दिली‌. कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त भाव मिळण्यासाठी आपला कापूस स्वच्छ करून व फर्दड कापूस वेगळा करून आणावा. सकाळी नऊ वाजता वाहने महेश खाजगी बाजार समितीच्या आवारात लावावीत, असे आवाहन महेश खाजगी बाजार समितीच्या सचिव शाम चौधरी व खरेदीदारांनी केले आहे.‌

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!