सेलूतील यासेर उर्दू शाळेत महिला दिन साजरा

सेलूतील यासेर उर्दू शाळेत महिला दिन साजरा

भाषणातून विद्यार्थिनींनी मांडले विचार 

सेलू : गौरव सेवाभावी संस्था संचलित यासेर उर्दू प्राथमिक शाळेत जगतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या वेळी शाळेतील विद्यार्थ्यांना राजमाता जीजाबाई, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले फातेमा शेख, रमाबाई आंबेडकर अहिल्यादेवी होळकर, मदर टेरेसा, पंडिता रमाबाई सरोजिनी नायडू, बेगम हजरत महल, अरुणा आसिफअली, राणी लक्ष्मीबाई, इंदिरा गांधी आदी महान महिलांच्या कार्यावर विद्यार्थीनींनी भाषणातून प्रकाश टाकला. सहशिक्षिका नजमा ख़ानम यांनी महिला दिनानिमित्त विशेष माहिती सांगितली. माविया हाशमी यांनी स्वातंत्र्यासाठी ज्या महिलांनी बलिदान दिले. अशा महिलांचा जीवनावर प्रकाश टाकला. मुख्याध्यापक जावेद खान फेरोज खान पठाण यांनी मनोगत व्यक्त केले. महिला हक्क चळवळीतील केंद्रबिंदू म्हणून महिला दिन साजरा केला जातो. हा दिवस लिंग समानता, पुनरुत्पादक हक्क आणि महिलांवरील हिंसा आणि अत्याचार यासारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करतो. हा दिवस २० व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात उत्तर अमेरिका आणि युरोपमधील कामगार चळवळींमधून सुरू झाला, असे सांगितले. सय्यद इमरान सय्यद अमन, शेख साजिद, सय्यद अज़ीम, सीमा पठाण, सय्यद ज़ीशान, नफीसा बाजी आदींनी परिश्रम घेतले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!