महिला दिनानिमित्त नारी शक्तीचा सन्मान
ज्ञानसाधना प्रतिष्ठानचा उपक्रम
परभणी : धर्मापुरी येथील ज्ञानसाधना प्रतिष्ठान संचालित रायरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त कर्तबगार नारी शक्तीचा सन्मान व विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.किरण सोनटक्के होते. या प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे, कैलास तिडके, गंगाबाई सोनटक्के, सचिव प्रा.शितल सोनटक्के आदींची प्रमुख उपस्थिती होती.क्रीडा स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, शिष्यवृत्ती सराव परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा पालका समवेत पारितोषिक देऊन तसेच महिला दिनानिमित्त महिला कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. शिष्यवृत्ती सराव परीक्षेतील गुणवंत अर्णव सचिन देशमुख, आनंदी लोहट, गायत्री फुलपगार, सत्यम बेले, आदित्य खैरे, श्रुत तयरल, मोहिनी रोडगे रोख पारितोषिक तसेच स्नेहसंमेलनात उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल ‘बळीराजा सन्मान योजना’ या विभागाला संस्थेच्या वतीने एक लाख रुपयाचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. प्रारंभी राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक प्रा.शितल सोनटक्के यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. एस.डी. धुळे यांनी केले. एम.जे.जोशी यांनी आभार मानले.