जागतिक तापमानवाढीबाबत सेलूत जनजागृती

जागतिक तापमानवाढीबाबत सेलूत जनजागृती

योगेश साखरे यांचे सायकल भ्रमणव्दारे जनजागरण

सेलू : जागतिक तापमानवाढीबाबत महाराष्ट्रभर सायकलवर भ्रमण करून जनजागृती करणाऱ्या करणाऱ्या योगेश साखरे यांनी जागतिक महिला दिन सेलू येथे भेट देऊन जनजागृती केली. संत ज्ञानेश्वरांच्या ‘हे विश्वचि माझे घर ‘ या ओवींप्रमाणे विश्वाचे कल्याण व्हावे, जागतिक तापमान वाढीचा फटका या जीवसृष्टी असलेल्या निळ्या ग्रहाला बसू नये म्हणून मागील एक वर्षापासून योगेश साखरे हा भारतीय हू येन त्संग अनवाणी सायकल प्रवास करत आहे. मंदिर, धर्मशाळा आणि ग्रामीण भागातील शाळा आदी ठिकाणी ते विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत आहेत. आनंदाचे वादळ निर्माण करत आहेत.
सेलू तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी येथील आनंदाच्या झाडांसोबत मनसोक्त गप्पा मारण्यासाठी सेलूत त्यांचे आगमन झाले. आनंदाच्या झाडाचे संस्थापक युवराज माने, सायकल प्रेमी कलाशिक्षक पांडुरंग पाटणकर व विद्यार्थ्यांसोबत त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या व तापमान वाढीच्या दुष्परिणामाचे महत्त्व पटवून दिले. जागतिक तापमान वाढीच्या सायकल प्रबोधन यात्रेत आत्तापर्यंत त्यांनी तीन हजार किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास केला असून संपूर्ण महाराष्ट्र ते पिंजून काढत आहेत. ८ मार्च रोजी सेलू तालुक्यातील पारडी जिल्हा परिषद शाळेतील कार्यक्रम संपवून रविवारी सकाळी योगेश साखरे यांनी लोणारच्या दिशेने पश्चिम विदर्भात मार्गक्रमण केले. अशा या ध्येयवेड्या अवलियाचे युवराज माने यांनी सेलूत स्वागत केले

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!