बहीणभावांची पवित्र रमजान सेवा 

बहीणभावांची पवित्र रमजान सेवा 

सेलूतील इब्राहिमखान व बशीरा मोबीन यांचे रोजा आणि कुराण पठण

सेलू : रमजान महिन्यात विशेष महत्व असलेला जीवनातील पहिला रोजा (उपवास ) लहान वयाच्या त्याला आयुष्य भर लक्षात राहील अशी आनंदायी आठवण ठरते असेच सेलू येथील गुलमोहर कॉलनीतील  इब्राहिम खान मोबीन खान वय वर्ष  आठच्या बालकाने जीवनातील रोजा पूर्ण करून केला व बहीण बशीरा मोबीन खान वय वर्ष अकरा हीने पवित्र कुराण पठण पूर्ण केल्या बद्दल भक्तीभावाने व उत्सवाने कुटंबाने साजरा करण्यात आला.

संयम व श्रदेचा अनुभव

इब्राहिम खान याने सकाळी भले पहाटे 5वाजता सहेरी करून उपवास सुरु केला. दिवसभर कोणतेही मागणी, तक्रार न करता त्याने संयम व श्रद्देने उपवास केला. यंदा रमजान ऐन उन्हाळ्यात आल्यामुळे रखरखत्या उन्हात पाण्याचा थेंबही न पिता जवळ पास १२-१३ तास राहण्याची शक्ती जणू अल्लाह या दिवसामध्ये देत असल्याची  रोजा करणाऱ्यामध्ये असते. त्याच्या या रोजा केल्यामुळे नातेवाईक व मित्र परिवार भारावून गेला.

रोजा इफ्तारचा आनंद

सायंकाळी सूर्यास्ता नंतर या दोघा बहीण भावांनी मोठया आनंदाने इफ्तार केला खजूर, फळे, ज्यूस घेऊन रोजा सोडण्यात आले या मुळे कुटंबियाने पहिला रोजा असल्यामुळे आनंदाने रोजा इफ्तारचे विशेष आयोजन केले होते. लहान मुले इतक्या लहान वयात भक्ती भावाने उपवास व कुराण पठण करणे हे आमच्यासाठी आभिमान आहे व हा दिवस समरणात ठेवण्याचा आहे असं बोलून दाखवत आहे.

धार्मिकगुरूंकडून कौतुक

सुलेमानिया मस्जिदचे पेशमाम मौलाना वहाब सहाब ब नदवी याच्या मार्गदर्शनानुसार  पठाण बशीरा हिने आपल्या जीवनातील कुराण पठण पूर्ण केले एवढ्या लहान वयात संयम व भक्तीने शिक्षण घेणे ही फार मोठी गोष्ट आहे. मौलाना यांनी  बहिणभावाचे कौतुक केले व सांगितले रमजान केवळ उपवासाचे नसून ते सहन शिलतेचे, दयाळू पणाचा व ईश्वर भक्तीचा आहे. या महिन्यात गोर गरिबांना अन्न दान करणे हे पुण्याचे काम आहे. या उपवासाचे व कुराण पठण पूर्ण केल्याबद्दल दोघा बहीण भावाचे मौलाना वहाब सहाबनदवी, हाजी रौफ, आमनखा, छोटे खान, मिरझा जहीर बेग, याकूब खान, हाजी निसार पठाण, अन्वर अली खान,आखेब खान डॉ.सोहेल खान, पठाण अजहर खान, शेख मोहसीन, पठाण अजीम खान,शेख जहीर, शेख असीम, इरफान जमीनदार, नदीम जमीनदार, फैसलखान, यामीन खान यांनी कौतुक केले आहे

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!