धुलिवंदनानिमित्त मातीस्नानाचे सेलूमध्ये आयोजन
श्रीरामजी भांगडिया रूग्णसेवा मंडळ आणि गांधी प्राकृतिक चिकित्सा केंद्राचा उपक्रम
सेलू : धुलिवंदनानिमित्त श्रीरामजी भांगडिया रूग्ण सेवा मंडळ व गांधी प्राकृतिक चिकित्सा केंद्रांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी शुक्रवारी (१४ मार्च रोजी) सेलू- मोरेगाव रस्त्यावरील हाॅटेल परिवार फार्म रेस्टॉरंट, कृषी पर्यटन या ठिकाणी मातीस्नान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमात सहभाग घेण्यासाठी इच्छुकांनी वल्लभ राठी ९४२२५४६४२८, आनंद बाहेती ९४२२८७५२१९, प्रवीण माणकेश्वर, ९४२०५०४०६४, भास्कर घोडके ८७८८५८३३५२, भगवान पावडे ८२७५९४८८३९, अक्षय हुगे ९१३०६८२३५८ यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन संयोजक शिवनारायण मालाणी यांनी केले आहे