परभणीत शिक्षकांचे ‘बोंबमारो’ आंदोलन
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार शिक्षक सेलच्या वतीने आयोजन
परभणी : राज्य सरकारच्या वतीने सोमवारी, १० मार्च रोजी मांडलेल्या २०२५-२६ या वर्षीच्या राज्य अर्थसंकल्पात अंशतः अनुदानीत व अघोषीत शाळांच्या टप्पा अनुदानासाठी कुठलीही तरतुद केलेली नाही. आश्वासन देऊनही शिक्षकांचा कोणताही विचार केला गेला नाही. यामुळे महाराष्ट्रातील ६० हजार शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार) महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी शिक्षक सेलच्या वतीने गुरुवारी, १३ मार्च रोजी शिक्षकांचे बोंबमारो आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मराठवाडा विभागीय अध्यक्ष प्रा.किरण सोनटक्के यांनी केले आहे.
लोकनेते विजयजी वाकोडे उपोषण भूमी येथे सकाळी ११ वाजता आंदोलन होणार आहे. या संदर्भात दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे की, निवडणुकीपूर्वी महायुतीच्या नेत्यांनी आपल्या सर्वांना अघोषित शाळांना, त्रुटीमध्ये असलेल्या शाळांना तसेच अंशतः अनुदानित शाळांना २० टक्के अनुदानाचा पुढील टप्पा देण्याचे आश्वासन दिले होते. निवडणुक झाल्यानंतर सर्व शिक्षक संघटनांनी आपाआपल्या परिने या प्रकरणाचा पाठपुरावा केला असता, अनुदानाची पूर्तता मार्च महिन्यात करू, असे फेरअश्वासन देवून महाराष्ट्रातील ६० हजार शिक्षकांना झुलवित ठेवण्याचे काम केले आणि जेंव्हा, अनुदान देण्याची वेळ आली त्या वेळेस शिक्षकांचा कसलाही विचार न करता अर्थसंकल्पात कुठलीही तरतुद न करता अर्थसंकल्प करण्यात आला. आंदोलनात सरकारने आपल्याला दिलेल्या आदेशाची (मंजुरी पत्र) होळी करण्यात येणार आहे, असे पत्रकात म्हटले आ