पाथरी येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महसूल आढावा बैठक संपन्न

पाथरी येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महसूल आढावा बैठक संपन्न

परभणी : जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी  दिनांक 12 मार्च 2025 रोजी तहसील कार्यालय, पाथरी येथे महसूल विभागाच्या विविध विषयांवर आढावा बैठक घेतली. या बैठकीस उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी, तहसीलदार एस. एन. हानदेश्वर, नायब तहसीलदार, महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी व इतर कर्मचारी उपस्थित होते. या बैठकीत प्रलंबित वसुली, गौण खनिज प्रकरणे, फेरफार प्रकरणे, अॅग्रीस्टॅक, ई-पिक पाहणी, नैसर्गिक आपत्ती क्लोजर अहवाल, ई-ऑफिस, लेखा परिच्छेद व रस्ता प्रकरणांचा आढावा घेण्यात आला.
जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल व गौण खनिज वसुली 30 मार्च 2025 पर्यंत 100 टक्के पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच, मुख्यमंत्री महोदयांच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत अॅग्रीस्टॅक, प्रलंबित फेरफार प्रकरणे, सेवाविषयक प्रकरणे व इतर कार्यालयीन कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!