मोफत बीएमडी तपासणी शिबिराला मोठा प्रतिसाद
सेलूतील रेणुका क्लिनिकचे डॉ.दिगंबर घोडके यांचा आरोग्यविषयक उपक्रम
सेलू : सेलू येथील रेणूका क्लिनिकचे डॉ.दिगंबर घोडके यांच्यावतीने रविवारी, ९ मार्च रोजी आयोजित मोफत बीएमडी तपासणी आरोग्य शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला. परिसरातील अडीचशेपेक्षा अधिक रुग्णांनी तपासणी शिबिराचा लाभ घेतला.
१५ वर्षापेक्षा अधिक वयाच्या ज्या रुग्णांना कंबर दुःखी, अंग दुखी व गुडघे दुखी, कमजोरी, थकवा येत असेल, सांधे दु:खी होत असेल, ज्यांच्या हाता पायला मुंग्या येतात, हात सुन्न होते, चक्कर येत असेल अशा अनेक रुग्णांची तपासणी करण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दीड हजार रूपये खर्चाची ही तपासणी मोफत करण्यात आली, असे डॉ.घोडके यांनी सांगितले.
सर्व सामान्य रूग्णांना हा खर्च परवडत नाही किंवा गरजेपोटी तो करावाच लागतो. मात्र, रेणुका क्लिनिकने सामाजिक भान ठेऊन हा उपक्रम मोफत राबविला आहे. छत्रपती संभाजीनगरहून संपूर्ण हाडाची तपासणी करण्यासाठी बीएमडी तपासणी यंत्र बोलावून घेण्यात आले होते. दोन ऑपरेटरच्या मदतीने सकाळी शिबीर यशस्वीतेसाठी डॉ.दिगंबर घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्य्क ऑपरेटर पंकज जोशी, सोमेश पाटील, संदीप गजमल,शिवाजी डासाळकर, श्रीकांत झुटे आदींनी परिश्रम घेतले.