तीन लाखांचे सोयाबीन चोरट्यांकडून लंपास

तीन लाखांचे सोयाबीन चोरट्यांकडून लंपास

सेलू येथील प्रसाद जिनिंग परिसरातील घटना

सेलू/परभणी : सेलू (जि.परभणी) येथील पाथरी रस्त्यावरील प्रसाद जिनिंग कमोडिटी प्रा.लि.परिसरात ठेवलेले सोयाबीनचे १५० कट्टे अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना नोव्हेंबर २०२४ मध्ये घडली होती. सोयाबीन खरेदी केलेले पावती बुक सापडल्याने या प्रकरणी गुरुवारी, २० मार्चरोजी सेलू पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. अनोळखी चोरट्याने ३ लाख १५ हजार रुपये किंमतीचे सोयाबीन चोरुन नेल्याची तक्रार प्रभुदयाल मंत्री यांनी दिली आहे.

फिर्यादीच्या मालकीची प्रसाद जिनिंग कमोडिटी प्रा. लि.आहे. या जिनिंगवर शेतमालाची खरेदी केली जाते. जिनिंग परिसरात त्यांनी सोयाबीनचे जवळपास ४०० ते ४५० कट्टे ठेवले होते. नोव्हेंबर महिन्यात या कट्टयांपैकी १५० कट्टे चोरीला गेले. या संदर्भात पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी पाहणी देखील केली. मात्र, त्यावेळी सोयाबीन खरेदी पावतीबुक सापडले नसल्याने तक्रार देण्यात आली नाही. पावती बुक मिळाल्यावर गुरुवारी, २० मार्चरोजी सेलू पोलीस ठाण्यात तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि चव्हाण अधिक तपास करत आहेत.

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!