प्रेमसिंधू : प.पू.श्रीगुरु नथुराम महाराज केहाळकर यांच्या जीवन चरित्र ग्रंथाचे प्रकाशन

प्रेमसिंधू : प.पू.श्रीगुरु नथुराम महाराज केहाळकर यांच्या जीवन चरित्र ग्रंथाचे प्रकाशन

जिंतूर तालुक्यातील पुंगळा येथे मंगळवारी आयोजन

जिंतूर : हभप युवकमित्र नारायण महाराज पांगरीकर लिखित “प्रेमसिंधू : प.पू.श्रीगुरु नथुराम महाराज केहाळकर जीवन चरित्र” या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा मंगळवार, २५ मार्च २०२५ रोजी दुपारी २.०० वाजता मैनापुरी देवस्थान, पुंगळा (ता.जिंतूर, जि.परभणी) येथे आयोजित करण्यात आला आहे.

या सोहळ्याचे अध्यक्षस्थान हभप डॉ.तुकाराम महाराज ठाकूरबुवा दैठणकर भूषविणार आहेत. तर ग्रंथाचे प्रकाशन कवी व संत साहित्य अभ्यासक प्रा.इंद्रजित भालेराव यांच्या हस्ते होणार आहे.

याप्रसंगी सावजी बँकचे अध्यक्ष मुकुंद सावजी कळमकर,अर्धापूर‌ (जि.नांदेड) येथील डॉ.शंकरराव चव्हाण महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.संगीता घुगे यांची उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन पंढरीनाथ देवस्थान संस्थान, पांगरी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!