रायपूर – हातनूर रस्त्याचे काम तत्काळ पूर्ण करा

रायपूर – हातनूर रस्त्याचे काम तत्काळ पूर्ण करा

ठेकेदाराची मनमानी, सा.बां.अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप

रायपूर - हातनूर रस्त्याचे काम तत्काळ पूर्ण करा

सेलू : रायपूर – हातनूर रस्त्याचे अपूर्ण काम तत्काळ पूर्ण करा, अशी मागणी सेलू तालुका दबाव गटाच्या वतीने उपमुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना १३ मार्चला निवेदन पाठवून करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, सेलू तालुक्यातील रायपुर-हातनूर सा रस्ताचे काम जून-२०२४ पासून चालू आहे. केवळ तीन किलोमीटर रस्त्याचे काम असतानासुद्धा काम संबंधीत ठेकेदाराने अद्याप पूर्ण केलेले नाही. त्यामुळे त्या ग्रामीण भागातील नागरिकांची अत्यंत गैरसोय होत आहे. वृद्ध, माता भगिनींना अडी-अडचणीच्या वेळीस तर अत्यंत त्रास होतो. सुरु केलेले व झालेले काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. अधिकारी व ठेकेदार यांची मनमानी चालू आहे. शासन चांगले निर्णय करत असताना हे संबंधीत अधिकारी व ठेकेदार संगनमताने त्या निर्णयाला केराची टोपली दाखवतात ही अत्यंत गंभीर बाब आहे.

रस्त्याचे काम दर्जेदार व तात्काळ पूर्ण करण्यात यावे. यासाठी वारंवार पाठपुरावा दोन वर्षापासून चालू आहे. मात्र सबंधीत ठेकेदार हेतुत: टाळाटाळ करीत आहे. केवळ तीन किलोमीटर रस्त्याचे पूर्ण करण्यामागे जवळ‌पास दोन वर्ष लागणे ही खेदाची बाब आहे. ठेकेदारास काम करावयाचे न‌सल्यास सदर काम अन्य ठेकदारास देऊन पूर्ण करावे. अशी माहिती आहे की, याच ठेकेदारास सा.बां.विभागातील अनेक कामे देण्यात आलेली असल्याने व अधिकार्‍यांची जवळीक असल्याने हा ठेकेदार सर्वच कामे अर्धवट करतो ही अत्यंत गंभीर बाब आहे.

वस्तुतः ३.१ किलोमीटरचे काम पूर्ण करण्यास अत्यंत दिरंगाई ठेकेदाराच्या मनमानी, बेजबाबदारपणामुळे झाले‌ली आहे. त्यास सा.बां.विभागातील अधिकारी देखील तेवढेच जबाबदार आहेत. कृपया आपण या प्रकरणी तात्काळ व्यक्तिशः लक्ष घालून रायपूर – हातनूर रस्त्याचे काम तत्काळ पूर्ण करण्याबाबत आदेशीत करावे ग्रामीण जनतेस न्याय द्यावा. निवेदनावर ॲड श्रीकांत वाईकर, इसाक पटेल, ओमप्रकाश चव्हाळ, मुकुंद टेकाळे, ॲड.देवराव दळवे, लक्ष्मण प्रधान, सतिश काकडे, गणेश सोळंके, परमेश्वर कादे, लक्ष्मण गायके, आबासाहेब भुजबळ, रामेश्वर गाडेकर, रमेश काकडे, गुलाब पोळ, उद्धव सोळके, नारायण पवार, सचिन गाडेकर, अजित मंडलिक, रोफ भाई, लिंबाजी कलाल, भाई कालाल, जलाल भाई, सुभाष काकडे, गणपत मिटकरी, ॲड.योगेश सूर्यवंशी, विकास गादेवार, दिलीप शेवाळे आदींच्या सह्या आहेत.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!