श्री कालिंकादेवीचा यात्रा महोत्सव सोमवारपासून 

श्री कालिंकादेवीचा यात्रा महोत्सव सोमवारपासून 

हेलस येथे कीर्तन, भजन आदींसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

आमदार बबनराव लोणीकर, मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष शरदराव भांडेकर यांची उपस्थिती 

परभणी : सेलू शहरापासून जवळच असलेल्या हेलस (ता.मंठा) येथील श्री कालिंका देवी संस्थानच्या वतीने श्री कालिंकामातेचा ४२ वा वार्षिक यात्रा महोत्सव सोमवार ते बुधवार ( ३१ मार्च ते २ एप्रिल) या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. संस्थानचे अध्यक्ष सतीश तळणीकर यांनी ही माहिती दिली. या वेळी उपाध्यक्ष सुभाष दहिभाते, सचिव बाबासाहेब हेलसकर, कोषाध्यक्ष बालासाहेब दहिभाते, बबनतात्या हेलसकर, शंकरराव हेलसकर गोपाळराव दहिभाते, माधव वानरे, गोपाळ नामदेव, गजानन कुंभकर्ण, वर्धमान कासार, अशोक हेलसकर यांची उपस्थिती होती. हेमाडपंथी बांधकाम शैलीतील सर्वोत्कृष्ट नमुन्यापैकी हेलस येथील श्री कालिंका देवी मंदिराचे बांधकाम आहे. भाविकांचे श्रद्धास्थान आणि सोमवंशी क्षत्रिय कासार समाजाची कुलस्वामिनी म्हणून सर्वदूर ख्याती आहे. मराठवाडा व विदर्भातील कासार समाज बांधव मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी करतात. या वर्षी यात्रेच्या निमित्ताने पारंपरिक महापूजा, महाभिषेक, महाआरती, कीर्तन, भजन, संगीत हरिपाठ, धार्मिक कार्यक्रमांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज सकाळी ७.३० ते ९.३० वाजता महावीर आहेर (भोगाव देवी), राजेश रवणे (अकोला) यांच्या मार्गदर्शनाखाली श्री कालिंकामातेला चढाव, अभिषेक, महापूजा, महाआरती, तर सायंकाळी देवीचा छबिना व आरती होईल. यात्रा महोत्सवात ठिकठिकाणचे समाज बांधव तसेच ग्रामस्थ यांच्याकडून तीनही दिवस भाविकांसाठी आराधना महाप्रसाद, अल्पोपहार तसेच जलसेवा आहे.

३१ मार्च, सोमवाररोजी दुपारी माजी मंत्री तथा परतूर-मंठा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर आणि अखिल भारतीय सोमवंशी क्षत्रिय कासार समाजोन्नती मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष शरदराव भांडेकर यांचा संस्थानच्या वतीने भव्य सत्कार करण्यात येणार आहे. दुपारी एक वाजता भागवताचार्य रामेश्वर महाराज नालेगावकर (मंठा) यांचे हरिकिर्तन होईल. सायंकाळी ६ वाजता रवळगाव (ता.सेलू) येथील जगदंबा भजनी मंडळाचे रामप्रसाद काका रोडगे यांच्या नेतृत्वाखाली हरिपाठ होईल.

१ एप्रिल, मंगळवाररोजी दुपारी एक वाजता समाजभूषण भागवताचार्य माणिक महाराज मांगुळकर (दहेगांव ता. जिंतूर) यांचे हरिकीर्तन होईल. २ एप्रिल, बुधवाररोजी दुपारी एक वाजता देविदास महाराज ढोके (आष्टी धो.जो.) यांचे ज्ञानेश्वरीवर प्रवचन होईल. दुपारी महाप्रसाद व सायंकाळी ७ वाजता कार्यकारिणीची बैठक व आरतीनंतर यात्रेचा समारोप होणार आहे. यात्रा महोत्सवासाठी कमिटीचे अध्यक्ष सतीश तळणीकर व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरीनाथ हेलसकर, नारायण कुंभकर्ण,भरत दहिभाते, गजानन हेलसकर, ज्ञानेश्वर हेलसकर, गजानन ढोले, सुरज दहिभाते, महेश ढोके आदींसह श्री गणेश भजनी मंडळी, हर हर महादेव वारकरी शिक्षण संस्था, श्री कालिंका महिला मंडळ व नवयुवक मंडळ पदाधिकारी सदस्य व समाज बांधव, ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!