कोणताही क्लास न लावता मधुरा चाटोरीकर बनली शिष्यवृत्तीधारक

कोणताही क्लास न लावता मधुरा चाटोरीकर बनली शिष्यवृत्तीधारक

एनएमएमएस परीक्षेत जिल्हा गुणवत्तायादीत ९ वे स्थान

कोणताही क्लास न लावता मधुरा चाटोरीकर बनली शिष्यवृत्तीधारक

परभणी : परभणी शहरातील गांधी विद्यालयाची वर्ग आठवीची विद्यार्थीनी मधुरा अविनाश चाटोरीकर-तुडमे हीने एनएमएमएस परीक्षेत जिल्ह्यात ९ वी रॅंक संपादन करत शिष्यवृत्तीधारक होण्याचा मान पटकावला आहे. विशेष म्हणजे कोणताही क्लास न लावता मधुराने हे यश मिळवले आहे.

मधुराला एकूण १८० पैकी १२६ गुण मिळाले आहेत. इयत्ता ५ वी मध्येही तिला शासनाची शिष्यवृत्ती मिळालेली आहे. तसेच मागील दोन वर्षांपासून तिला गुणवत्तेसाठीची सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती मिळत आहे. या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी मुकुंदराजे खिस्ते पाटील, मुख्याध्यापक वर्गशिक्षक श्री दळवे, मार्गदर्शक गणेश पार्डे, कृषी विभाग, महाराष्ट्र शासनाचे मुख्य गुण नियंत्रक पी.डी.देशमुख, शिवसेना नेते अजित मगर, उपविभागीय कृषी अधिकारी बबन वाघ, ज्ञानसाधना शैक्षणिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के, जिजाऊ ज्ञानतीर्थ शैक्षणिक प्रतिष्ठानचे सचिव नितीन लोहट, कृषी अधिकारी गजेंद्र मगर, सतीशराव सोळंके , बाबा काळदाते, उद्योजक पवन डोणगावकर, प्रा. सुरेश क्षत्रिय तसेच दत्तराव आनंदराव सुरवसे, जय दिलीपराव वैद्य, विजय दिलीपराव वैद्य, रेखा विनायक शामे, सोपान यमे, विभागात लेखापाल सतीश शिंदे यांनी मधुराचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!