माधवअण्णा लोकुलवार यांचे कार्य प्रेरणादायी

माधवअण्णा लोकुलवार यांचे कार्य प्रेरणादायी

पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचे प्रतिपादन, सेवापूर्ती सोहळ्यात लोकुलवार यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

परभणी : पोलीस कॉन्स्टेबल ते सहाय्यक पोलीस निरीक्षक पदापर्यंत माधव लोकुलवार अण्णा यांनी महाराष्ट्र पोलीसदलात ३८ वर्ष प्रामाणिक सेवा केली. सेवा करीत परभणी जिल्ह्यातील ११० कुटुंबातील तरुणांना मोफत पोलिस भरती प्रशिक्षणाची सुविधेच्या माध्यमातून सरकारी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली. लोकुलवार अण्णा यांचे हे कार्य प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले.

सेलू येथील साई नाट्यगृहात मंगळवारी, १ एप्रिल रोजी लोकुलवार मित्रमंडळाच्या वतीने माधवअण्णा लोकुलवार व राजश्री लोकुलवार यांचा सेवापूर्ती गौरव समारंभात भव्य सत्कार करण्यात आला. त्यावेळी मंत्री बोर्डीकर बोलत होत्या. या प्रसंगी उपविभागीय अधिकारी संगीता सानप, तहसीलदार डॉ.शिवाजी मगर, माजी नगराध्यक्ष विनोदराव बोराडे, जिपचे माजी सभापती अशोक काकडे, आर्यवैश्य महासभेचे प्रदेश कार्याध्यक्ष भानुदास वट्टमवार, गोविंदराव पाटील, प्रदीप कोकडवार, सूर्यकांत कोकड, हरिष कत्रुवार, बालाजी रुद्रवार, पंडीतराव केंद्रे, संदीपान शेळके, रामनाना पाटील आदींसह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

या वेळी विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक संस्था व व्यक्तींनी लोकुलवार यांचा सत्कार केला. प्रास्ताविक मोहन कोतावार यांनी केले. सूत्रसंचालन सुभाष मोहकरे यांनी केले. उपेंद्र बेल्लूरकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला वर्षा कोल्हेकर, दत्ता घुले, विनायक मुनगीलवार, कांताबाई लोकलवार, अर्जुनराव लोकुलवार, डॉ.मंथन लोकुलवार, गणेश माळवे, सच्चिदानंद डाखोरे आदींसह विविध क्षेत्रातील नागरिकांची उपस्थिती होती.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!