जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी प्रा.किरण सोनटक्के

जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी प्रा.किरण सोनटक्के

परभणीत फुले-आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

परभणी : येथील सर्वधर्मीय फुले-शाहू-आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी ज्ञानसाधना प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा शिक्षक मित्र प्रा.किरण सोनटक्के यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. बुधवारी, १ एप्रिल रोजी सावित्रीबाई फुले मुलींचे हायस्कूलमध्ये प्राचार्य डाॅ.विठ्ठल घुले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महोत्सव समितीची कार्यकारिणी गठित करण्यात आली. कार्याध्यक्षपदी डाॅ.सुरेश हिवराळे, मुजांजी शेवाळे, सचिव सुशिलकुमार देशमुख, त्र्यंबक वडसकर, मुख्य समन्वयक अनिता सरोदे यांची निवड करण्यात आली.
जातीअंताच्या लढ्यातून समतामुलक समाज निर्मितीचा ध्यास घेतलेल्या महानायकांची जयंती साजरी करण्याची अनोखी परंपरा मागील सोळा वर्षांपासून सर्वधर्मीय फुले-शाहू-आंबेडकर जयंती महोत्सवाच्या माध्यमातून जपली गेली आहे. यावर्षीही विविध उपक्रमांच्या आयोजन करण्यात आले असल्याचे अध्यक्ष प्रा.किरण सोनटक्के यांनी सांगितले.

समितीमध्ये मुख्य प्रवर्तक यशवंत मकरंद, सुनील ढवळे, संजीव आढागळे, रवी पंडीत, डाॅ.सुरेश हिवाळे, डाॅ.सुनील जाधव, सुभाष ढगे, सहादु ठोंबरे, कचरुदादा गोडबोले, सुहास पंडीत, अमित मोगल, भुषण मोरे, नितिन जाधव गोगलगावकर, प्रमोद अंभोरे, आकाश खिल्लारे, संदिप वायवळ, रमेश घनघाव, संजय बगाटे, संयोजन प्रमुख प्राचार्य डाॅ.विठ्ठल घुले, प्रसाद गोरे, अजय देशमुख, परमेश्वर जवादे, माणिक कदम, प्रा.डाॅ.चंद्रकांत गांगुर्डे, दुर्गानंद वाळवंटे, दिलिप बनकर, संघपाल आढागळे, मनिषा गोरे, दुर्गा धाबे, सिध्दांत सूर्यवंशी, एस.के.पाटोळे, गजानन लामदाडे, रामेश्वर पुरी, डॉ.संतोष मलसटवाड, विजेंद्र धापसे, डॉ.काशिनाथ पल्लेवाड, अनंतकुमार विश्वंभर, किशोर कटारे, व्यंकट तोरणाळे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश आहे.

विविध उपक्रमांचे आयोजन

११ एप्रिलला महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुर्णाकृती पुतळा परिसरात ‘अखंड वाचन’ १४ एप्रिलला डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळ्याजवळ विचार वेधक देखावा, आंतरराष्ट्रीय विचार उत्सव, त्रैभाषिक संविधान कवी संमेलन, परिसंवाद, सलग १८ तास अभ्यास अभियान, सम्यक जीवन गौरव पुरस्कार प्रदान सोहळा, संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ग्रामीण भागात भारतीय संविधान वाटप, आदर्श भीम जयंती मंडळांना पुरस्कार, लेझिम पथक आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत, असे अध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के व मुख्य प्रवर्तक यशवंत मकरंद यांनी सांगितले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!