ग्राहक चेतनेतून अपप्रवृत्तींवर अंकुश ठेवता येईल : डॉ.विलास मोरे
सेलू : ग्राहक संरक्षण कायद्याच्या आधारे काही प्रश्न सोडविता येतीलही, पण त्यालाही मर्यादा आहेच. म्हणून आपले प्रश्न सोडविण्यासाठी स्वत:च पुढाकार घ्यावा लागतो. स्वत:च स्वत:ची शक्ती निर्माण करावी लागते अन् वाढवावीही लागते. त्याचसाठी हवे असते प्रबोधन व जागृती. शोषणमुक्तीचा तोच मूलाधार आहे. ग्राहक चेतनेतून अपप्रवृत्तींवर अंकुश ठेवता येईल आणि हेच कार्य ग्राहक पंचायत ही स्वायत्त संस्था करीत आहे. असे प्रतिपादन अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे देवगिरी प्रांत अध्यक्ष डॉ. विलास मोरे यांनी सेलू येथे केले.
बुधवार, २ एप्रिल रोजी तहसील कार्यालय सेलू व अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने नूतन महाविद्यालयाच्या सभागृहात जागतिक ग्राहक दिनानिमित्त ग्राहक प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अध्यक्षस्थानी उपविभागीय कार्यकारी अधिकारी संगीता सानप, उद्घाटक अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे प्रांत अध्यक्ष डॉ विलास मोरे, तहसीलदार डॉ. शिवाजी मगर, उपप्राचार्य महेंद्र शिंदे, जिल्हाध्यक्ष गुलाबराव शिंदे, जिल्हा सहसचिव सुनील गायकवाड, तालुकाध्यक्ष जाधव सतीश, काशिनाथ पल्लेवाड, तालुका सचिव मंजुषा कुलकर्णी, तालुका उपाध्यक्ष गंगाधर कान्हेकर, शुकाचार्य शिंदे, पुरवठा निरीक्षक मदन यादव, महसूल अधिकारी प्रदीप वानखेडे, पुरवठा निरीक्षक ऋषिकेश पौळ, प्रदीप कौसळीकर, डॉ राजेंद्र मुळावेकर, लक्ष्मीकांत दिग्रसकर, तसेच वजन व मापे निरीक्षक, गॅस एजन्सी धारक, राशन दुकानदार व महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तहसीलदार शिवाजी मगर म्हणाले की, ग्राहकांना हक्कांची जाणीव व्हावी आणि तो बाजारात खरेदीच्या हक्कांबाबत सक्षम व्हावा, यासाठी विविध संघटना विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जागरूकता निर्माण करतात. यासाठीच जागतिक ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो.
उपविभागीय अधिकारी संगीता सानप म्हणाल्या की, ग्राहकांना सेवा पुरवताना होणार्या हलगर्जीपणामुळे १९६२ मध्ये अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीमध्ये ग्राहकांच्या प्रश्नांचा निचरा करण्यासाठी एक व्यासपीठ तयार करण्यात आले आणि त्यासाठीचे जागतिक स्तरांवर पाठपुरावेही करण्यात आले. त्याला युनेस्कोनेही मान्यता दिली. यावेळी उपप्राचार्य महेंद्र शिंदे, काशिनाथ पल्लेवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले