जिजाऊ आयटीआयच्या ७२ विद्यार्थ्यांची रोजगारासाठी निवड

जिजाऊ आयटीआयच्या ७२ विद्यार्थ्यांची रोजगारासाठी निवड

परभणी :‌ परभणी शहरातील पाथरी रोड परिसरात असलेल्या जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या ७२ प्रशिक्षणार्थींची मुलाखतीद्वारा चाकण एमआयडीसी पुणे येथील नामांकित कंपनीमध्ये अंतिम निवड करण्यात आली आहे.‌ उद्घाटनप्रसंगी संस्था सचिव नितीन लोहट, चाकण एमआयडीसी पुणे येथील मानव संसाधन अधिकारी गोविंद वाघमारे, वैष्णवी भगत, प्राचार्य ज्ञानेश्वर तरवटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या प्लेसमेंट ड्राईव्हकरिता एकूण १०७ प्रशिक्षणार्थ्यांनी नोंदणी केली होती. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा संस्थेचे अध्यक्ष रामराव लोहट, सचिव नितीन लोहट, उषाताई लोहट यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन आणि व्यवस्थापन विभाग प्रमुख एन.एन.चव्हाण यांनी केले. गटनिदेशक सिद्धेश्वर जाधव यांनी आभार मानले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!