टेबल टेनिसपटू आद्या बाहेती, शरयू टेकाळे यांचा गौरव
परभणी : जागतिक युवा मालिका टेबल टेनिस स्पर्धेत परभणी येथील आद्या महेश बाहेती हीने अकरा वर्षाखालील वयोगटात ब्राँझपदक पटकावले आहे. तर शालेय राष्ट्रीय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेत शरयु माधव टेकाळे हीने जळगाव येथील राज्य मानांकन स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपली दावेदारी सिद्ध केली आहे. याबद्दल त्यांचा परभणी जिल्हा हौशी टेबल टेनिस असोसिएशनच्या रोख पारितोषिक धनादेश, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी जिल्हा संघटनेचे कार्याध्यक्ष प्रा.डाॅ.माधव शेजुळ, प्रशिक्षक चेतन मुक्तावार, डॉ.महेश बाहेती, माधव टेकाळे, सारिका टेकाळे, पूजा बाहेती आदींसह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.