सेलूतील फिनकिड्समध्ये पदवी प्रदान कार्यक्रम उत्साहात
सेलू : सेलू येथील फिनकिड्स प्लेज्युकेशन सेंटर या ठिकाणी पदवी प्रदानचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, प्रॉस्परस पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका प्रगती क्षीरसागर, फिनकिड्सच्या धनश्री हुगे, ज्ञानतीर्थ बालवाडीच्या कालिंदी पवार व पालक प्रतिनिधी शिवानी जाधव, माधुरी जंगले, भगवान मोगल आदी मान्यवर उपस्थित होते.
कारवी जाधव, ईश्वरी रोडगे, अवदेश जंगले, लोकेश पोहणे, अथर्व वाघमारे, स्वराज हारके यांनी आपली शाळेबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली. अध्यक्षीय समारोपात डॉ.संजय रोडगे यांनी विद्यार्थी व पालकांसोबत मार्गदर्शनपर संवाद साधून भावी शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारिका ताठे यांनी केले तर आभार प्रदर्शन जाधव यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.