एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत धीरज आघाव याचे यश
सेलू : शहरातील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित विवेकानंद विद्यालयाचा विद्यार्थी धीरज विठ्ठल आघाव इयत्ता आठवीच्या वर्गासाठी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एन.एम.एम.एस.) परीक्षेत शिष्यवृत्ती धारक झाला आहे. स्थानिक व्यवस्था मंडळाचे अध्यक्ष हरिभाऊ चौधरी, स्थानिक कार्यवाह उपेंद्र बेल्लुरकर, शालेय समिती अध्यक्षा करुणा कुलकर्णी, मुख्याध्यापक शंकर शितोळे, रागिणी जकाते, अनिल कौसडीकर, विनोद मंडलिक, गजानन साळवे यांनी यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले.