निम्नदुधना प्रकल्पावर आढळला तपकिरी डोक्याचा कुरव

निम्नदुधना प्रकल्पावर आढळला तपकिरी डोक्याचा कुरव

पक्षी निरीक्षक विजय ढाकणे यांची माहिती

निम्नदुधना प्रकल्पावर आढळला तपकिरी डोक्याचा कुरव

सेल : शहरापासून जवळच असलेल्या वाकडी धरणावरील निम्न दूधना प्रकल्पावर तापकीरी डोक्याचा कुरव (ब्राऊन हेडेड गुल) हा समुद्रीपक्षी आढळून आल्याची माहिती पक्षी निरीक्षक विजय ढाकणे यांनी दिली.

माधव गव्हाणे व डॉ शरद ठाकर यांच्यासह रविवार (दि 06 एप्रिल) रोजी त्यांनी वाकडी धरणाच्या दरवाजाजवळ पक्षी निरीक्षण केले असता त्यांना हा तपकीरी डोक्याचा कुरव पक्षी दोनच्या संख्येने आढळून आला.

तपकिरी डोक्याचा कुरव हा काळ्या डोक्याच्या कुरवपेक्षा मोठा असतो. डोक्याचा अर्धा भाग फिकट तपकिरी रंगाचा, शरीर फिकट राखाडी, चोंच आणि पाय गडद लाल रंगाचे असतात. शेपटीचा टोकाचा भाग आणि दोन्ही पंखाच्या टोकाचा भाग काळसर असतो. हा जलचर, पाणथळी पक्षी असल्याने सतत पाण्यावर तरंगल्यासारखा वाटतो. पाण्याखाली डोके बुडवून पाण्याच्या पृष्ठभागावरून शिकार करतो. पाण्यातील किटक, गांडुळे, समुद्री अपृष्ठवंशिय प्राणी आणि धान्य देखील खातो. तपकिरी डोक्याचा कुरव दलदलीच्या वसाहतीमध्ये किंवा तलावातील बेटावर प्रजनन करतो. त्याचे घरटे मात्र जमिनीवर असते. मध्य आशियातील उंच पठारावर ताजीकीस्तानापासून ते मँगोलियातील ऑर्डोस पर्यंत हा प्रजनन करतो. हा स्थलांतरित पक्षी असल्याने भारतीय उपखंडातील समुद्री किनाऱ्यांवर आणि मोठ्या तलावावर हिवाळा घालवतो. वसाहतीने राहून गोंगाट करणारी ही एक प्रजाती आहे.

कुरव हा तसा समुद्राच्या काठावर राहणारा पक्षी आहे. स्थलांतर करणारे अनेक पक्षी बऱ्याचदा भरकटतात. त्यामुळे आपल्या भागात ते दिसतात. यापूर्वी तौते वादळामुळे भरकटलेला छोटा चोरकावळा जिंतूर तालुक्यातील येलदरी जलाशय परिसरात दिसला होता. – विजय ढाकणे, पक्षीनिरीक्षक

निम्नदुधना प्रकल्पावर आढळला तपकिरी डोक्याचा कुरव

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!