सेलूत सेवा संकल्प शिबीरासह विविध कार्यक्रमांचे आयोजन
पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या पुढाकार
८ ते १० एप्रिल या कालावधीत भव्य आयोजन
विविध सरकारी योजनांच्या माहितीसाठी
“लखपती दिदी योजना” संदर्भात चर्चासत्र
“संगीनराज” हा लाईव्ह ऑर्केस्ट्रा
विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण
शेतकरी मार्गदर्शन शिबिर
क्रांती नाना माळेगावकर प्रस्तुत ” न्यू होम मिनिस्टर”
सेलू जि.परभणी : परभणी जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक तसेच दरडोई उत्पन्न हे राज्यातील तुलनेने कमी पातळीवर असल्यामुळे, शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावी आणि विभागीय जनजागृती व्हावी यासाठी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या पुढाकाराने भव्य “सेवा संकल्प शिबीर” आयोजित करण्यात आले आहे.
हे शिबीर ८ एप्रिल ते १० एप्रिल 2025 या कालावधीत सेलू (जि. परभणी) येथील नूतन महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर होणार आहे, त्यासाठीची जय्यत तयारी सुरू आहे. मंगळवारी, ८ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. या वेळी आमदार संजय केनेकर, खासदार अजित गोपछडे, माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या तीन दिवसीय शिबिरात सरकारच्या विविध विभागांच्या योजनांची माहिती देणारे स्टॉल्स, उत्पादक पुरवठा धारक कंपन्यांची उत्पादने, जनसंवाद सत्रे, आरोग्य तपासणी शिबीर आणि विविध मार्गदर्शनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
८ एप्रिल रोजी दुपारी २:३० वाजता महिला व बालविकास विभाग अंतर्गत “लखपती दिदी योजना” संदर्भात चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. चर्चासत्रात प्रमुख वक्त्या म्हणून संगीता चव्हाण (नागपूर) मार्गदर्शन करणार आहेत.
सायंकाळी ७ वाजता “संगीनराज” हा लाईव्ह ऑर्केस्ट्रा राजेश भावसार सादर करणार आहेत.
बुधवारी, ९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता परभणी जिल्ह्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण आहे. याप्रसंगी विधान परिषदेचे सभापती सभापती रामजी शिंदे, मंत्री शिवेंद्रसिंहजी राजे भोसले
माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर यांची उपस्थिती राहणार आहे. दुपारी. २:३० वाजता ‘कृषी, ऊर्जा व आरोग्य’ या विषयावरील शेतकरी मार्गदर्शन शिबिरात तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. सायंकाळी ६:३० वाजता दीपस्तंभ प्रतिष्ठानच्या वतीने क्रांती नाना माळेगावकर प्रस्तुत ” न्यू होम मिनिस्टर” हा मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे.
गुरुवारी, १० एप्रिल रोजी आरोग्य शिबीर तसेच विविध योजना माहिती स्टॉल्स, नागरिक संवाद सत्रे सुरू राहतील. १०:३० महावितरण विभागीय कार्यालयाचे उद्घाटन आहे. विविध उपक्रम कार्यक्रमांचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात येत आहे. हा उपक्रम शासन आणि जनतेतील दरी कमी करून सर्वसमावेशक विकास घडवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आ