सेलूत मोफत सर्व रोग तपासणी व मार्गदर्शन शिबीर
पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या वाढदिवसानिमित्त काकडे सेवाभावी संस्थेतर्फे आयोजन
सेलू : पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या वाढदिवसानिमित्त स्व.आण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेच्या वतीने गुरूवारी, १० एप्रिलरोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मोफत सर्व रोग तपासणी व मार्गदर्शन शिबीर आणि भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित या शिबिरामध्ये रक्त, रक्तदाब, मोफत हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी निदान (ECG, हिमोग्लोबिन आणि साखर), मधुमेह तपासणी, नाक, कान, स्क्रॅच तपासणी, नेत्ररोग, स्त्रीरोग, त्वचारोग, बाल रोग, पोटाचे विकार, अस्थिरोग (हाडांचे विकार), मूळव्याध तपासणी, दंत तपासणी आदी तपासणी होणार आहेत. या वेळी मोफत औषधी व चष्मे वाटप केले जाणार आहे. तपासणी नंतर भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
निदान झालेल्या आजारांच्या पुढील उपचारासाठी रुग्णांना संस्थेच्या वतीने मार्गदर्शन व मदत करण्यात येईल. सर्व गरजु रुग्णांनी या शिबीराचा लाभ घ्यावा. नाव नोंदणीसाठी भारतीय जनता पार्टी कार्यालय, सेलू मो.9307273988, 9420141715 तसेच सचिन धापसे मो. 9405111100, चेतन निकम मो. 8530020300, संदीप काष्टे मोहम्मद.9168465150, अनिकेत शिंदे मो. 8956040406 यांच्याशी संपर्क साधवा, असे आवाहन आयोजक तथा स्व.आण्णासाहेब काकडे सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अशोक काकडे यांनी केले आहे.