श्री साईबाबा मंदिरात श्रीरामजन्मोत्सव उत्साहात

श्री साईबाबा मंदिरात श्रीरामजन्मोत्सव उत्साहात

सेलूत हजारो भाविकांनी घेतला नगरभोजन महाप्रसाद

श्री साईबाबा मंदिरात श्रीरामजन्मोत्सव उत्साहात

सेलू जि.परभणी : सेलू् येथील महेशनगरमधील श्री साईबाबा मंदिरात आयोजित रौप्यमहोत्सवी श्री साई महोत्सवात रविवारी श्रीराम जन्मोत्सव सोहळा उत्साहात पार पडला. यानिमित्ताने आयोजित पारंपरिक नगरभोजनाचा वीस हजारांवर भाविकांनी लाभ घेतला. सकाळी दहा वाजता शिवाजी महाराज खवणे यांचे काल्याचे कीर्तन झाले. दुपारी बारा वाजता श्री राम जन्मोत्सव, महाआरती झाली. संस्थांनकडून गव्हाच्या पिठाच्या बॅग घेऊन महाप्रसादाच्या पोळ्या महिलांनी घरून तयार करून आणून देत सहभाग घेतला.

दरम्यान, महोत्सवानिमित्त भागवताचार्य संजय महाराज पिंपळगावावर यांनी श्रीमद् भागवत कथेचे निरूपण केले. श्रीकृष्ण रूक्मिणी प्रसंगी डोईजडकर व साखरे परिवारातील आकांक्षा व अमोल यांचा विवाह वीरशैव लिंगायत धर्म पद्धतीने थाटात पार पडला. माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे मित्रमंडळ व बोराडे परिवारातर्फे विवाह सोहळ्याची परंपरा यंदाही जपण्यात आली. या प्रसंगी तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष मुकेशराव बोराडे, माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, व्यंकटबापू चव्हाण, लक्ष्मण बुरेवार, सुधाकर डोईजडकर, सुरेश साखरे, राजेंद्र झोडगावकर, प्रतिक बोराडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. सात दिवस नामवंत कीर्तनकारांनी सेवा दिली. गुढीपाडव्यानिमित्त आयोजित सुंदर माझी गुढी स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. माजी नगरसेविका उर्मिला बोराडे, विजया बोराडे, नयना बोराडे, रवी कुलकर्णी, रवी मुळावेकर, अशोक मसुरे आदींसह माता भगिनी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महोत्सवासाठी मंदिर समिती, महेशनगरमधील महिला, नागरिक, स्वयंसेवक आदींसह संयोजन समितीने पुढाकार घेतला. दरम्यान, शहर व तालुक्यातील विविध मंदिरांमध्ये रामजन्म सोहळा उत्साहात पार पडला.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!