प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या तनिष्का तेलभरेची इस्रोतील कार्यक्रमासाठी निवड
सेलू : प्रिन्स इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी तनिष्का तेलभारे (वर्ग 9 वा ) हिची भारतीय अवकाश संशोधन संस्था (ISRO) आयोजित युवा वैज्ञानिक कार्यक्रम (YUVIKA) 2025 साठी निवड झाली आहे. ISRO दरवर्षी देशभरातील हुशार आणि विज्ञानामध्ये रस असलेल्या विद्यार्थ्यांना “युविका” कार्यक्रमाद्वारे प्रशिक्षण देतो. या वर्षीही देशभरातून हजारो विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यामधून तनिष्काची निवड होणे ही अत्यंत गौरवाची बाब आहे. तनिष्काच्या या यशाबद्दल श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, सचिव डॉ.सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा.महादेव साबळे, प्राचार्य कार्तिक रत्नाला,प्रगती क्षीरसागर, मार्गदर्शक शिक्षक नारायण चौरे, शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले आहे.