सेलूत मोफत नेत्र तपासणी शिबिराला प्रतिसाद

सेलूत मोफत नेत्र तपासणी शिबिराला प्रतिसाद

लॉयन्स क्लबचा उपक्रम, १०० रूग्णांची तपासणी

सेलू : येथील लॉयन्स क्लबच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबीरात १०० रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करून २५ रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी परतूर येथील लॉयन्स नेत्रालयात पाठवण्यात येणार असल्याची माहिती तालुका सचिव डॉ.बाळासाहेब जाधव यांनी दिली.
येथील चिरायू रुग्णालयात रविवारी, ६ एप्रिल रोजी हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. नेत्र तपासणीसाठी लॉयन्स नेत्रालयाचे डॉ. अशोक पौळ, आकांक्षा केवारे, शब्दाली धनले यांनी यांनी काम पाहिले तर शेख फरीद, निता महाजन, माऊली भाबट, आनंदी काळे, गायत्री साळवे यांनी सहकार्य केले. तालुकाध्यक्ष सुयश पटवारी, उपाध्यक्ष अजीत सराफ, कोषाध्यक्ष डॉ.शैलेश मालाणी, डॉ.उमेश गायकवाड, डॉ.अनुराग जोगदंड, डॉ.परेश बिनायके, डॉ.कुंदन राऊत, दतात्रय सोळंके, डॉ.कैलास आवटे , डॉ.आशिष मेहता, डॉ.सुदर्शन मालाणी आदीसह सदस्यांनी परिश्रम घेतले

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!