नूतन विद्यालयाच्या १६ विद्यार्थ्यांना एनएमएमएस शिष्यवृत्ती

नूतन विद्यालयाच्या १६ विद्यार्थ्यांना एनएमएमएस शिष्यवृत्ती

सेलू : सेलू (जि.परभणी) येथील नूतन विद्यालयातील एकूण १६ विद्यार्थी एनएमएमएस परीक्षव्दारे शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. यामध्ये सहा विद्यार्थी एनएमएमएस आणि दहा विद्यार्थी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा बुधवारी,९ एप्रिलरोजी सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया होते. या वेळी संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.व्ही.के.कोठेकर, शालेय समितीचे अध्यक्ष सीतारामजी मंत्री, मुख्याध्यापक एस.व्ही.पाटील, उपमुख्याध्यापक के.के.देशपांडे, पर्यवेक्षक आर.एस.मोगल उपस्थित होते. एनएमएमएस शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांना १२ वी पर्यंत चार वर्षात एकूण ४८ हजार रूपये, तर मराठा, कुणबी, मराठा – कुणबी समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील सारथी शिष्यवृत्तीपात्र विद्यार्थ्यांना एकूण ३६ हजार रूपये शिष्यवृत्ती मिळणार आहे, अशी माहिती विभाग प्रमुख व्ही.यू.धापसे यांनी प्रास्ताविकात दिली. सूत्रसंचालन एस.एम.हिवाळे यांनी केले. यादी वाचन डॉ.संतोष मलसटवाड व गणेश माळवे यांनी केले.संभाजी रोडगे यांनी आभार मानले.

शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांची नावे अशी – एनएमएमएस शिष्यवृत्ती – साईराज अनिल दौड, मृण्मयी भारत इक्कर, पार्थ विठ्ठल चौधरी, आरीज खान आजेम खान पठाण, सुबोध सिद्धार्थ गायकवाड, अधिराज संतोष पतंगे, छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती – पार्थ साहेबराव उगले, सार्थक गजानन डोंबे, सत्यम नारायण गुगाने, अभिजित वसंतराव बोराडे, शुभम उद्धव तळेकर, अनुष्का अमोल चव्हाण, अशिष गोविंद ताठे, सुरज अंबादास मोगल, स्वराज दिपकराव शिंदे, वीरेंद्र विठ्ठलराव जाधव

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!