अश्विनकुमार शेंडगे याची इस्रो युविकासाठी निवड
परभणी : अश्विनकुमार विनोद शेंडगे या विद्यार्थ्यांची इस्रो युथ इनोव्हेटर प्रोग्राम २०२५ या विज्ञान प्रशिक्षण शिबिरासाठी निवड झाली आहे. अश्विनकुमारने आजपर्यंत टेक्नोशियन वर्ल्ड कप रोबो रेस, शालेय राज्यस्तरीय सायकलिंग स्पर्धा, भारत सरकारच्या टपाल विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या दीनदयाळ स्पर्श स्कॉलरशिप योजना यात उल्लेखनीय चमक दाखविली आहे. त्याला या स्पर्धेसाठी युरेकाचे श्री.भूषण, तसेच आईवडील विनोद शेंडगे, अश्विनी शेंडगे यांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल त्याचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.