पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू

पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू

सेलूतील नूतन विद्यालय शिक्षण संस्था पदाधिकाऱ्यांनी शाळापयोगी साहित्य भेट देत व्यक्त केल्या शुभेच्छा

सेलू (सकाश न्यूज नेटवर्क) : राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) विभागाच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा आज गुरूवारी, १० एप्रिलरोजी वाढदिवस आहे. यानिमित्ताने सकाळी सात वाजल्यापासूनच त्यांच्या हितचितंकांनी, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, सामाजिक संस्था पदाधिकाऱ्यांनी तसेच नागरिक, महिलांनी सेलू येथील बोर्डीकर यांच्या निवासस्थानी गर्दी करीत शुभेच्छांचा वर्षाव सुरू केल्याचा आनंद दिसून येत आहे.

नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या वतीने स्कूल बॅग, वह्या, पेन आदीसह विविध शाळापयोगी साहित्याचे बॉक्स भेट देऊन पालकमंत्री बोर्डीकर यांना शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया, सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाशजी बिहाणी, शालेय समिती अध्यक्ष सीतारामजी मंत्री, नंदकिशोरजी बाहेती, दत्तरावनाना पावडे आदींसह सुनील भोंबे, गणेश काटकर, बालाजी देऊळगावकर आदींची उपस्थिती होती.

वाढदिवसाच्या निमित्ताने पालकमंत्री बोर्डीकर यांनी आपल्या हितचिंतकांना आणि सहकारी बंधू भगिनींना दोन दिवसापूर्वीच एक जाहीर आवाहन केलेले आहे. या वर्षी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना बॅनर-हार-तुरे-शाल-श्रीफळ किंवा भेटवस्तू न देता, वही-पेन-पुस्तके अर्थात शाळापयोगी वस्तू भेट म्हणून द्याव्यात, ज्या गरजू होतकरू विद्यार्थ्यांना भरारी घेण्याचे पंख देतील, तसेच वृक्ष लागवड करून आपल्या भारताचे हिरवागार नंदनवन करण्यासाठी हातभार लावावा, अशी साद घातली. या आवाहनाला प्रतिसाद देत, बुधवारपासूनच पालकमंत्री बोर्डीकर यांच्यावर वृक्षांचे रोपटे व शालेय साहित्य भेट देऊन तसेच शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेत शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!