वयोवृद्ध सेवानिवृतांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र दिनी उपोषण
महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष एम.के.कादरी यांचे निवेदन
सकाश न्यूज नेटवर्क, जिंतूर : वयोवृद्ध सेवानिवृत्तांच्या विविध मागण्याचा पाठपुरावा करून जिल्हा परिषद प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने महाराष्ट दिनी, एक मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे एक दिवसीय उपोषण करत असल्याबाबत लेखी निवेदन महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटना जिल्हा शाखा परभणीच्या वतीने देण्यात जिल्हा अध्यक्ष एम.के.कादरी यांच्या कडून देण्यात आले आहे.
निवेदनात दिलेल्या माहिती नुसार सेवानिवृत्तीनंतर पेन्शन विक्री रकमेचे १८० हप्ते पंधरा वर्षे कपात झाल्यानंतरही कपात तत्काळ बंद करून ते हप्त्याची रक्कम पेन्शनमध्ये सामील करण्यात यावी, तसेच १८० हफ्ते कपाती नंतरही कपात बंद करण्यासाठी सेवानिवृत्ताकडून अर्ज करण्याचा आग्रह धरण्यात येऊ नये, कारण प्रशासनाकडे सर्व माहिती उपलब्ध असल्याने अंश राशीचे १८० हफ्ते कपात होतात प्रशासनाने अंशराशिक रकमेची कपात बंद करावी, तसेच ज्या सेवानिवृत्तीचे अंशरशिकचे १८० पेक्षा अधिक हप्ते कपात झालेले आहेत. ते उर्वरित कपात रकमा सेवानिवृत्तांना तत्काळ अदा करण्यात याव्या. शासन निर्णयानुसार ज्या सेवानिवृत्तीचे ८० वर्ष वयोमान पूर्ण झाले त्यांच्या मूळ पेन्शनमध्ये २०%, ८५ वर्ष पूर्ण झालेल्यांना ४० टक्के, ९० वर्ष पूर्ण झालेल्यांना मूळ पेंशन मध्ये ६० टक्के, ९५ वर्ष पूर्ण झालेल्याना वेतनात ८० टक्के, व १०० वर्ष पूर्ण झाल्यानंतर मूळ सेवानिवृत्त धारकांच्या मूळ सेवानिवृत्ती वेतना ६० टक्के ९५ वर्षे पूर्ण झालेल्यांना ८०% व १०० वर्ष पूर्ण झालेल्या सेवानिवृत्ती वेतनधारकाच्या मूळ सेवानिवृत्ती वेतनधारकांच्या वेतनात शंभर टक्के वाढ देण्यात यावी.या वाढदिवसासाठी वयोवृत्त सेवानिवृत्त का कडून अर्जा साठी अग्रह धरण्यात येऊ नये. कारण प्रशासनाकडे सेवानिवृत्तांची संपूर्ण माहिती उपलब्ध असल्याने शासन स्तरावरच वाढीव पेन्शनची कारवाई पूर्ण करण्यात यावी तसेच सेवा काळातील अतिप्रधान रकम या सेवानिवृत्त यांच्या उपदानातून वसूल करण्यात आल्या त्या रकमा सेवानिवृत्तांना तत्काळ करत करण्यात याव्या सेवानिवृत्तांच्या उपदान ८० राशीत गट विमा व भविष्य निर्वाह निधी या रकमा सेवानिवृत्तांना पीपीओ दिल्या त्या तारखेपासून तीन महिन्यात अदा करण्यात याव्या सेवानिवृत्तांच्या पीपीओ प्रदान केल्याच्या तारखेपासून जेष्ठतेप्रमाणे सेवानिवृत्तांना उपदान आयुष्य अदायत्री करण्यात यावी. गोपाळराव वसंतराव कुलकर्णी सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक प्रशाला देऊळगाव गात तालुका सेलू यांच्या अतिउत्कृष्ट कार्याबद्दल दोन वेतन वाढीच्या मागणी संदर्भात मा.उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांचा संदर्भ दिलेल्या निर्देशनाचे अनुपालनसाठी कार्यपालन समिती नेमून प्रकरण निकाली काढण्याची मागणी ही लेखी निवेदनात करण्यात आली आहे तसेच जमशेटे आर.बी. सेवानिवृत्त मुख्याध्यापक पाथरी ३१ जून २०२२ रोजी सेवानिवृत्त झाले. परंतु विभागीय चौकशी असल्याने त्यांचे उपदान अंशराशिक लाभही त्यांना मिळाले नाही. आठ एप्रिल २०२५ पर्यंत त्यांची विभागीय चौकशी प्रवाही आहे. पाच वर्षे उलटूनही अद्याप सादर कर्ता चौकशी अधिकारी ही नेमण्यात आला नाही. तेव्हा ही चौकशी निरस्त करून त्यांचे सेवानिवृत्तीचे सर्व आर्थिक लाभ त्यांना देण्यात यावी अशी ही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
या सर्व मागण्याची कार्यवाही करून प्रकरणे निकाली काढावी अन्य असंख्य मागण्यांयासाठी महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर अधिकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष एम.के.कादरी हे जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे एक मे रोजी एक दिवशी उपोषण करत असल्याचे निवेदन देण्यात आलेले आहे. निवेदनावर संघटनेच्या अन्य पदाधिकाऱ्यांच्या ही स्वाक्षऱ्या आहेत. सदर निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर तसेच विभागीय आयुक्त व उप मुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन परभणी यांना देण्यात आलेल्या आहेत.