भाजपाच्या सेलू तालुकाध्यक्षपदी गणेश काटकर, अशोक शेलार शहराध्यक्ष
सकाश न्यूज नेटवर्क, सेलू : भारतीय जनता पक्षाच्या सेलू तालुकाध्यक्षपदी (ग्रामीण) गणेश हरिभाऊ काटकर, तर सेलू शहराध्यक्ष पदी अशोक रतनराव शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) संतोष मुरकुटे यांनी २० एप्रिल रोजी पत्राद्वारे कळविले आहे. भाजपाचे जिल्हा पदाधिकारी तसेच ज्येष्ठ नेते रामप्रसाद बोर्डीकर आणि पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात शहर व तालुक्यात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आणि सरकारच्या विविध कल्याणकारी योजना लाभार्थींपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे श्री.काटकर व श्री.शेलार यांनी सांगितले. नियुक्तीबद्दल त्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.