“सेवा हक्क दिन” विविध उपक्रम राबवून जनसहभागासह साजरा करावा : जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे
सकाश न्यूज नेटवर्क, परभणी : दि. 28 एप्रिल हा दिवस “सेवा हक्क दिन” म्हणून साजरा केला जातो. यावर्षी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम- 2015 च्या दशकपूर्तीचे औचित्य साधून विविध उपक्रम राबवून हा दिवस जनसहभागासह साजरा करावा व नागरिकांमध्ये उक्त अधिनियमाबाबत, राज्य सेवा हक्क आयोगाबाबत तसेच आपले सरकार पोर्टल मार्फत ऑनलाईन उपलब्ध सेवांबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी सर्व विभागप्रमुखांनी केली.
“सेवा हक्क दिन” साजरा करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आज विभागप्रमुखांची बैठक पार पडली. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांच्यासह विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते. ग्रामपंचायत स्तरावर व जिल्हा पातळीवर सेवा हक्क दिन कशा पध्दतीने साजरा करायचा याबाबत महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाने सूचना निर्गमित केल्या आहेत. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
सेवा हक्क दिनाच्या निमित्ताने जिल्हा स्तरावर आयोजित करावयाचे कार्यक्रम खालीलप्रमाणे आहेत –
जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयात दि. 28 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता सर्व अधिकारी, प्रथम व द्वितीय अपिलीय प्राधिकारी व सर्व संबंधित कर्मचारी अधिकारी यांनी सेवेची बांधिलकी मानणारी शपथ घेणे. “सेवा हक्क दिवसा” च्या अनुषंगाने मा. पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, पत्रकार, नागरिक यांचे उपस्थितीत समारंभाचे आयोजन करणे.
सदर कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 ची वैशिष्ट्ये विषद करणे. विविध विभागांच्या सेवा देण्याच्या कामाचा आढावा सादर करणे. उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव करणे. आदर्श आपले सरकार केंद्राचे उद्घाटन / कोनशिला समारंभ दि. 28 एप्रिल रोजी आयोजित करणे. जिल्ह्यात सेवादूत योजना सुरू करणे. सर्व आपले सरकार केंद्र व सर्व शासकीय कार्यालयात सेवांची व शुल्कांची माहिती देणारा क्युआर कोड लावणे.
नागरिकांना एसएमएसव्दारा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाबाबत व आपले सरकार पोर्टलबाबत अवगत करणे. गर्दीच्या ठिकाणी जसे की, आठवडी बाजार, पर्यटन स्थळे, तीर्थ स्थळे. इत्यादी ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 विषयी माहिती फलक (क्युआर कोडसह) प्रदर्शित करणे. विद्यार्थी/ महिला / इतर घटक यांच्याशी सदर कायद्याविषयी सुसंवाद साधून या कायद्याविषयी जनजागृती करण्याच्या दृष्टीने दि.28 एप्रिल रोजी मेळाव्यांचे आयोजन करणे. शालेय / महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015, राज्य सेवा हक्क आयोग व आपले सरकार पोर्टल या संदर्भात निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा परिसंवाद इ. चे आयोजन करणे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या व्यापक व प्रचार व प्रसिध्दी साठी भारत स्काउट, एन.सी.सी. व एन.एस.एस. च्या विद्याथ्यांचा सहभाग घेऊन व्यापक स्वरूपात कार्यक्रमांचे आयोजन करणे. विविध माध्यमांव्दारे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015ची प्रचार-प्रसिध्दी करणे. नवीन आपले सरकार सेवा केंद्रांचे उद्घाटन / कार्यान्वयन करणे.
सेवा हक्क दिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायत स्तरावर आयोजित करावयाचे कार्यक्रम –
दि.28 एप्रिल रोजी सर्व ग्रामपंचायतींमध्ये ग्रामपंचायतीच्या विशेष सभेचे आयोजन करणे, त्यात महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 च्या प्रती सर्व ग्रामपंचायत सदस्यांना देणे व उक्त कायद्याच्या ठळक तरतूदीचे वाचन करणे. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, अंतर्गत विहित सूचना फलक या पूर्वी लावले नसल्यास तसे माहिती फलक लावणे. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये अधिसूचित सेवांची व शुल्कांची माहिती देणारा क्युआर कोड लावणे. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये तक्रार नोंदवण्यासाठो क्युआर कोड लावणे. ग्रामपंचायत स्तरावरील आपले सरकार सेवा केंद्रांमार्फत अधिसूचित करण्यात आलेल्या सर्व ऑनलाईन सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्याची सुरूवात करणे. ग्रामपंचायत स्तरावर उभारावयाच्या आदर्श आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन/ कोनशिला समारंभ दि.28 एप्रिल रोजी आयोजित करणे. विभागप्रमुखांनी काटेकोर नियोजन करुन दिलेल्या सुचनांप्रमाणे सेवा हक्क दिन साजरा करण्याची सूचना जिल्हाधिकारी यांनी केली.