जिंतुरमध्ये उद्या विविध कार्यक्रम; मंत्री धनंजय मुंडे यांची उपस्थिती

बुद्धविहार लोकार्पण, भिमगीत रजनी, कार्यकर्ता मेळावा, माजी आमदार भांबळे यांची माहिती

Authored By Babasaheb Helaskar

जिंतूर : पालकमंत्री तथा सामजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री धनंजय मुंडे सोमवारी ( सहा जून) जिंतूर-सेलू दौऱ्यावर येत असून, त्यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती माजी आमदार विजय भांबळे यांनी शनिवारी दिली.
दुपारी दोन वाजता जिंतूर नगरपालिकेअंतर्गत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या बाजूला उभारण्यात आलेल्या सम्राट अशोक बुद्धविहाराचा लोकार्पण सोहळा आहे. या वेळी डॉ.उपगुप्त महाथेरो, पूर्णा, बोधीपालो महाथेरो, औरंगाबाद, खासदार फौजियाखान आमदार बाबाजानी दुर्राणी, माजी खासदार सुरेश जाधव, माजी आमदार मधुसुदन केंद्रे, विजय गव्हाणे, विजय वाकोडे, प्रताप देशमुख, राजेश विटेकर, अजय चौधरी, भरत घनदाट, प्रसादराव बुधवंत, मनोज थिटे, सबियाबेगम फारुकी, बाळासाहेब भांबळे, प्रेक्षा भांबळे, अशोक अंभोरे आदींची उपस्थिती राहणार आहे. सायंकाळी सुप्रसिद्ध गायक आनिरुद्ध वनकर (नागपूर) यांचा भिमगीतांचा कार्यक्रम आहे. नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन माजी आमदार विजय भांबळे यांनी केले आहे. दरम्यान, यानिमित्ताने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जिंतूर-सेलू तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
शनिवारी माजी आमदार विजय भांबळे यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम स्थळाची पाहणी केली. या वेळी रामराव उबाळे, अभिनय राउत, बाळासाहेब भांबळे, मनोहर डोईफोडे, शाहेद बेग मिर्झा, दलमीर पठाण, अहेमद बागबान, उस्मान पठाण, श्यामराव मते, चंद्रकांत बहिरट, बंटी निकाळजे, दत्तराव काळे, लखुजी जाधव, शोएब जानेमिया, सोहेलसर, ज्ञानेश्वर मते आदींची उपस्थिती होती.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!