सेलूतील नूतन विद्यालय केंद्रावर महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षा सुरळीत

सेलूतील नूतन विद्यालय केंद्रावर महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षा सुरळीत

पुणे येथील नौरोसजी वाडिया महाविद्यालय यांचा उपक्रम 

सकाश न्यूज नेटवर्क, सेलू : पुणे येथील नौरोसजी वाडिया महाविद्यालय यांच्या वतीने शनिवारी, २६ एप्रिल रोजी आयोजित महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षा सेलू येथील नूतन विद्यालय केंद्रावर शिस्तबद्ध वातावरणात सुरळीतपणे पार पडली.

बहिस्थ निरीक्षक प्रा.डॉ.दिगंबर रोडे, श्री शिवाजी महाविद्यालय परभणी यांनी यशस्वीरित्या काम पाहिले. विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेबाबत विशेष आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा दिसून आली. या परीक्षेत इयत्ता आठवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमता, तार्किक विचारशक्ती, गणितीय कौशल्य व भाषिक ज्ञान तपासण्यासाठी घेतली जाते. विद्यार्थ्यांनी अत्यंत निश्चल आणि आत्मविश्वासपूर्ण वातावरणात परीक्षा दिल्याचे सेलू तालुका समन्वयक सुधीर जोशी यांनी सांगितले.

प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांचे वितरण, परीक्षा केंद्रांची व्यवस्था, वेळेचे काटेकोर पालन व परीक्षेचा संपूर्ण नियोजनबद्ध कारभार हे सर्व नूतन विद्यालयाच्या कुशल नियोजनामुळे सुरळीत पार पडले. मुख्याध्यापक संतोष पाटील, उपमुख्याध्यापक किरण देशपांडे, पर्यवेक्षक रोहिदास मोगल यांच्या मार्गदर्शनाखाली विभागप्रमुख सुधीर जोशी व शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परीक्षेचे आयोजन उत्तमरीत्या पार पाडले. मुख्याध्यापक संतोष पाटील यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक करत सांगितले, ” महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षा विद्यार्थ्यांना त्यांच्या गतीने विचार करण्याची व निर्णय घेण्याची क्षमता वाढवते. या परीक्षेमुळे स्पर्धात्मक परीक्षांसाठी मुलांचा पाया अधिक भक्कम होतो.”

परीक्षेनंतर विद्यार्थी व पालक दोघांनीही समाधान व्यक्त केले. पालकांनी नूतन विद्यालयाच्या अभ्यासू आणि प्रगतशील दृष्टिकोनाचे विशेष कौतुक केले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!