भगवान श्री परशुराम जन्मोत्सव : सेलूत रक्तदान शिबिराचे आयोजन
सेलू : येथील भगवान श्री परशुराम जन्मोत्सव समितीच्या वतीने २७ एप्रिल, रविवार रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत श्रीकेशवराज बाबासाहेब महाराज मंदिर मंगल कार्यालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदात्यांनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन भगवान परशुराम जन्मोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.