रेल्वे बोर्ड सदस्यपदी डॉ.शिवाजी शिंदे
सकाश न्यूज नेटवर्क, सेलू : सेलू येथील डॉ.शिवाजी रामभाऊ शिंदे यांची नुकतीच रेल्वे बोर्ड सदस्यदी नियुक्ती करण्यात आली. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी माजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या शिफारशीवरून रेल्वे बोर्ड सदस्यपदी ही नियुक्ती डॉ.शिंदे यांची नियुक्ती केली आहे. जिल्ह्यातून प्रथमच रेल्वे बोर्ड सदस्यपदी निवड झाल्याने यापुढे रेल्वे प्रवाशांच्या सोयीसुविधा वाढीसाठी तसेच रेल्वेस्थानकांच्या विकासासाठी देखील प्रयत्न करणार असल्याचे शिंदे यांनी सांगीतले. रेल्वे विभागा अंतर्गत संतुलित आहार, पैंट्री कार, बुक स्टॉल आदि सेवाचे निरीक्षण करून रेल्वे प्रवाशांच्या सेवेत वाढ कशी करता येईल, याचा विचार करून सल्ला घेतला जाईल. डॉ.शिंदे यांच्या नियुक्ती बद्दल विविध स्तरांतून स्वागत होत आहे.