साईबाबा बँकेतर्फे हज यात्रेकरूंचा सत्कार
सेलू : येथील साईबाबा नागरी बँकेच्या मुख्य कार्यालयात शुक्रवारी, २ मेरोजी हज यात्रेकरूंचा सत्कार संस्थापक अध्यक्ष हेमंतराव आडळकर यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी माजी नगराध्यक्ष पवन आडळकर, उपाध्यक्ष चंद्रशेखर मुळावेकर, संचालक दतराव आंधळे, शेख इम्रान, मुख्य कार्यकारी अधिकारी रामराव लाडाणे, माजी नगरसेवक मुश्ताक भाई, खाजा भाई आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या वर्षी हज यात्रेसाठी जाणाऱ्यांमध्ये सयद हकीम कादरी, हकीम बागवान, हनीफ ईशानी, सयद रियाजद्दीन, शेख अर्षद, सोफिन मोदी यांचा समावेश आहे. या यात्रेकरूंचा सत्कार मक्का मदीनाची प्रतिमा व शाल, पुष्पहाराने करण्यात आला. शुभेच्छा देण्यात आल्या.
प्रत्येक मुस्लिम बांधवाने आयुष्यात एकदा तरी ही यात्रा करावी असा कुराणमध्ये आदेश आहे. ही एक पवित्र यात्रा समजली जाते.
अल हिज्जाह या महिन्यामध्ये सौदी अरबीया या देशातील मक्का व मदीना या पवित्र शहरी ही यात्रा भरते. सूत्रसंचालन व्यवस्थापक संतोष हुंगे यांनी केले. आभार व्यवस्थापक निसार पठाण यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अविनाश आडळकर, सुनील आडळकर, प्रितेश जोशी, गजानन झुटे, उमेश खरावणे, अजय मरळी यांनी प्रयत्न केले.