लॉयन्स क्लबच्या शिबिरात १३० रूग्णांची मोफत नेत्र तपासणी

लॉयन्स क्लबच्या शिबिरात १३० रूग्णांची मोफत नेत्र तपासणी

सेलू : येथील लॉयन्स क्लबच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबीरात 130 रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली असून मोतीबिंदू असलेल्या रुग्णांना शस्त्रक्रीयेसाठी टप्याटप्याने परतूर येथील दृष्टी लॉयन्स नेत्रालयात पाठवण्यात येणार असल्याची माहिती तालुका सचिव डॉ.बाळासाहेब जाधव यांनी दिली.
येथील चिरायू रुग्णालयात रविवार दिनांक 04 मे रोजी हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. नेत्र तपासणीसाठी लॉयन्स नेत्रालयाचे डॉ.अशोक पौळ,आकांक्षा केवारे , शब्दाली धनले यांनी यांनी काम पाहिले तर शेख फरीद, निता महाजन, माऊली भाबट, आनंदी काळे, गायत्री साळवे यांनी सहकार्य केले. तालुकाध्यक्ष सुयश पटवारी, उपाध्यक्ष अजीत सराफ, कोषाध्यक्ष डॉ शैलेश मालाणी, डॉ उमेश गायकवाड, डॉ.अनुराग जोगदंड, राजेंद्र सराफ,डॉ परेश बिनायके,डॉ.कुंदन राऊत, दतात्रय सोळंके, डॉ कैलास आवटे,डॉ आशिष मेहता, डॉ सुदर्शन मालाणी ,अनुप गुप्ता , सुभाष मोहकरे आदी सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!