मुख्याध्यापक बालासाहेब हळणे यांचा सेवागौरव

मुख्याध्यापक बालासाहेब हळणे यांचा सेवागौरव

श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयात कार्यक्रम

सेलू : सेवानिवृत्ती हा सेवेचा पूर्ण विराम नसून नवीन आयुष्याची सुरुवात असल्याचे प्रतिपादन श्री केशवराज बाबासाहेब शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सदस्य अशोक चामणीकर यांनी केले. येथील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयात प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बालासाहेब हळणे यांचा सेवानिवृत्तीबद्दल सेवागौरव करण्यात आला. त्या वेळी श्री.चामणीकर बोलत होते.

व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून श्री.चामणीकर, केंद्रप्रमुख एकनाथ जाधव, ज्ञानोबा हळणे, सत्कारमूर्ती बालासाहेब हळणे, मंगलताई हळणे, मुख्याध्यापक सिद्धार्थ एडके, संजय धारासुरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. श्री हळणे यांचा सपत्नीक शाल श्रीफळ, सन्मान चिन्ह, सन्मान पत्र व भेटवस्तू देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी एकनाथ जाधव, संजय धारासुरकर, सिद्धार्थ एडके,सेवानिवृत्त मुख्याध्यापिका आश्रावंती हिवाळे,मधुकर कुलकर्णी आदींनी शुभेच्छापर मनोगतातून श्री.हळणे यांच्या सेवाकार्याचा गौरव केला. सत्काराला उत्तर देताना श्री. हळणे यांनी मागील 34 वर्षांपासूनच्या सर्व आठवणी सांगितल्या व आपल्या कार्यकाळात शाळेने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत तालुक्यात दुसरा क्रमांक मिळवून दोन लाख रुपयांचे पारितोषिक पटकावल्याबद्दल समाधान व्यक्त केले तसेच  शिक्षक योगेश ढवारे यांना राज्य सरकारचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. अनेक विद्यार्थी बिटीएस, शिष्यवृत्ती, बिडीएस या स्पर्धा परीक्षेत झळकले याबद्दल आनंद व्यक्त केला.

दिलीप बेदरकर यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन योगेश ढवारे यांनी केले व आभार मंगेश कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रमांस ज्येष्ठ पत्रकार नारायण पाटील, आप्तेष्ट, नातेवाईक, माजी मुख्याध्यापक, शिक्षक व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!