डॉ.शिवाजी शिंदे यांचा पंडित दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठाकडून सत्कार
सेलू : सेलू येथील डॉ.शिवाजी रामभाऊ शिंदे यांची (झेडआरयूसीसी) रेल्वे बोर्ड सदस्य पदी निवड झाल्या बद्दल पंडित दीनदयाल हिंदी विद्यापीठातर्फे श्री प्रभु रामचंद्र यांच्या जन्मभूमी अयोध्या धाम येथे नागरी सत्कार करण्यातआला. या वेळी पद्मश्री डॉ.अरविंद कुमारजी, कुलगुरू डॉ.इंदू भूषण मिश्राजी, भागवत कथा वाचक दीपा मिश्राजी आदींची प्रमुख उपस्थिती होती. सत्काराला उत्तर देताना डॉ.शिंदे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, मी एका सामान्य कुटुंबात जन्मलो असून स्वतःच्या कर्तृत्वाने आपली ओळख निर्माण करून आज भारत देशातील केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या विशेष अभिरुची ने उच्चत्तम अशा रेल्वे बोर्ड जेड आर यू सी सी चे सदस्य या पदावर नियुक्ती केली याचा मला सार्थ अभिमान आहे. माजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे साहेब, महेश आकात, मुकेशराव बोराडे, सरपंच मधुकर नाना सोळंके, शाम गजमल व अनेकांचे सहकार्य लाभले. त्या बद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी विविध राज्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यापीठातील सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.