‘फुले’ चित्रपट पाहण्याची सेलूकरांना संधी
मीनाक्षी चित्रपटगृहात ९ मेरोजी झळकणार
सेलू : महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील ‘फुले’ चित्रपट सेलू येथील मीनाक्षी चित्रपट ग्रहामध्ये ९ मे २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. फुले प्रेमींनी हा चित्रपट आवार्जून पाहावा, असे आवाहन करण्यात आले आहे. २५ एप्रिलपासून महाराष्ट्रातील चित्रपटगृहात ‘फुले’ हा चित्रपट प्रदर्शीत झालेला आहे. आता सेलूकरांनाही चित्रपट पाहाण्याची संधी फुले प्रेमींन उपलब्ध झाली आहे. या संदर्भात उपविभागीय अधिकारी तसेच चित्रपट गृह व्यवस्थापकास निवेदन देऊन मागणी करण्यात आली होती. निवेदनावर अशोक अंभोरे, विधीज्ञ प्रभाकर गिराम, प्रभाकर इंगळे, महेश नावाडे, कृष्णा गोरे, दीपक मगर, कुंडलिक नाईकनवरे, रामदास कटारे, संजय भाग्यवंत आदींच्या सह्या आहेत.