गटकळ अकॅडमीची ‘वैष्णवी ‘पुणे कारागृह पोलिसपदी
सेलू जि.परभणी : नुकत्याच लागलेल्या निकालांमध्ये सेलू येथील गटकळ करिअर अकॅडमीची विद्यार्थिनी वैष्णवी प्रकाश राठोड (रा.सोनापुर ता.जिंतूर यांची पुणे कारागृह पोलीसपदी निवड झाली. याबद्दल अकॅडमीतर्फे वाजत गाजत, फटाक्यांची आतिषबाजी करत जोरदार सत्कार करण्यात आला. या नियुक्ती बद्दल सर्व स्तरातून वैष्णवीचे अभिनंदन होत आहे. गटकळ अकॅडमीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. याप्रसंगी अकॅडमीचे संचालक प्रा.रामेश्वर गटकळ, प्रा.दीपक गटकळ, गोपाळ ताठे, मैदानी प्रशिक्षक योगेश राठोड, मुंबई पोलिस दलातील लक्ष्मी चव्हाण, प्रेरणा लाटे, वैष्णवीचा संपूर्ण कुटुंबिय उपस्थित होते. अकॅडमीतील सर्व स्टाफ तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिद्द, चिकाटी, मेहनत व त्याचबरोबर सातत्य टिकून ठेवलं तर तुम्ही यशाला नक्कीच गवसणी घालू शकता असे मत वैष्णवीने व्यक्त केले.